Ads

जनावरांच्या मांसाची तेलंगणात वाहतूक करताना बल्लारपूर पोलिसांनी वाहनासह १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बल्लारपूर:-बल्लारपूर मध्ये बेकायदेशीररीत्या जनावरांच्या मांसाची तेलंगणात वाहतूक करताना बल्लारपूर पोलिसांनी वाहनासह १८ लाख रुपयांचा माल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे.
While transporting animal meat to Telangana, Ballarpur police seized the vehicle along with goods worth Rs. 18 lakh
गुप्त माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील गोसंरक्षण वॉर्डजवळ सापळा रचून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात प्लॅस्टिकने झाकलेले जनावराचे मांस आढळून आले सदर वाहनावर कारवाई करण्यात आली असून त्यात सुमारे 8 लाख रुपये किमतीचे मांस जप्त करण्यात आले आहे. तसेच एमएच 40 एके 4873 क्रमांकाच्या आयशर वाहनाची किंमत 10 लाख रुपये ठरविण्यात आली होती, अशा प्रकारे एकूण मालाची किंमत अंदाजे 18 लाख रुपये असून वाहन जप्त करण्यात आले. वाहन चालक फरार झाला असून एक आरोपी मोहम्मद इम्रान मोहम्मद इर्शाद वय 30, रा. कोयला ता. कामठी जि. नागपूर याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे

ही कारवाई पोलीस निरीक्षक असिफराज शेख यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, सहायक पोलीस निरीक्षक दीपक कंक्रीद्वार, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक भास्कर कुंदावार, एएसआय गजानन डोईफोडे यांच्या पथकाने केली. , हेड कॉन्स्टेबल रणविजयसिंग ठाकूर , वशिष्ठ रंगारी , शेखर माधनकर , लखन जाधव , गणेश पुरडकर, राहुल घुडसे इ.पोलीस पथकाने केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment