Ads

पिंपरी बोरी येथे नीताताई मडावी (बोरेले) यांची सभा संपन्न

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
पांढरकवडा येथील प्रसिद्ध विसल ब्लोअर आणि सामाजिक कार्यकर्ता, रजनीकांत डालूरामजी बोरेले यांची पत्नी नीता ताई मडावी (बोरेले) यांची मौजा पिंपरी (बोरी) या गावात सभा झाली आहे. सभेला महिला आणि पुरुष यांनी हजेरी लावली होती.
Meeting of Nitatai Madavi (Borele) concluded at Pimpri Bori
नीता ताई मडावी यांनी मनोगत व्यक्त करतांना केळापुर - आर्णी मतदार संघातील दयनीय अवस्था आणि शेतकरी यांच्या वाढती आत्महत्या, बेरोजगारी तसेच महिला जाणीव जागृती यावर विस्ताराने मनोगत व्यक्त केले आहे.
या वेळी रजनीकांत बोरेले यांनी आपल्या भाषणातून 70, वर्षात मतदार संघाचे किती हाल झाले आहे आणि किती उद्योग आणले आहे.ऐकून किती शेतकरी यांच्या आत्महत्या झाल्या आहे. किती तरुण - तरुणी रोजगार नसल्या मुळे आई - वडिलांना व मतदार संघाला सोडुन इतर शहरात रोजगार करीता गेले आहे.
पुढे म्हणाले मतदार संघातील ज्यांनी - ज्यांनी लोक प्रतिनीधी म्हणून नेतृत्व केले आहे. त्यांनी स्वताचे आर्थिक विकास भरपूर केला आहे. ज्या वेळी हया सत्ता भोगी पुढारी तुमच्या गावी निवडणुकीच्या काळात येईल तेव्हा त्यांना जाब विचारावे की विकास मतदार यांचा झाला की नेत्यांचा विकास झाला आहे.
जो पर्यंत शेतकरी, मध्यम वर्गीय कुटुंब आणि उपेक्षित महिला व बेरोजगार तरुण मूल - मूली यांचा आर्थिक विकास होत नाही तो पर्यंत आत्महत्या थांबणार नसून केळापुर - आर्णी मतदार संघ सुखी होवू शकत नाही. असे मनोगत रजनीकांत बोरेले यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी अनेक मतदार यांनी लोक प्रतिनिधित्व केलेल्या पुढारीने खोटे आश्वासन देवून लोकांची फसगत गेल्या बाबत रोष व्यक्त केले आहे. यावर रजनीकांत बोरेले यांनी लोकांना उत्तर देतांना सांगितले की याला जवाबदार मतदार हाच आहे. पक्ष पाहता की कार्य करणारा व्यक्ती पाहता आम्ही आश्वासन देणार नाही तर करुण दाखवीणार असे म्हटल्याने लोकांचे समाधान झाले आहे हे विशेष
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment