Ads

टेमुर्डाजवळील अपघातात एक ठार

सादिक थैम वरोरा : चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टेमुर्डा गावाजवळ नागपूरकडे जात असलेल्या ट्रेलरला कारने मागून धडक दिली. या अपघातात एकजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
One killed in an accident near Temurda
यावेळी अपघातग्रस्त दोन्ही वाहने महामार्गावर अडून पडल्याने सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.राष्ट्रीय महामार्गावरील टेमुर्डा गावाजवळ एक ट्रकमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सदर ट्रक पोलिसांनी रस्त्याच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, नागपूरकडे निघालेल्या जीजे १२ बी वाय ७२४४ क्रमांकाच्या ट्रेलरला मागून येणाऱ्या एम. एच. ३१ एजी ९३५१ क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कार ट्रेलरच्या मागच्या भागात घुसल्याने कारचा समोरील भाग चकनाचूर झाला. यात सुरेश चव्हाण (५०) यांचा मृत्यू झाला. तर, शैलेश रंगारी (५०) व एस. व्यंकटेश (५४) हे गंभीर जखमी झाले. मृतक व जखमी रेल्वे अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती आहे.
जखमींवर वरोरा येथे प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविण्यात आले आहे. अपघाताग्रस्त ट्रेलर व कार महामार्गावर मध्यभागी असल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी अपघाताग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment