घाटंजी तालुका प्रतिनीधी :-
नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बोध्दीसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्माची दिक्षा दिली ज्या ठिकाणावरून मानव मुक्तीचे रणसिंग फुंकल्या गेले जिथे आमच्या पिढ्यान् पिढ्याचा उध्दार झाला त्याठिकाणाला सोंदर्य करण्याच्या नावाखाली दिक्षाभूमीचे पावित्र्य नष्ट करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे.
Immediately cancel the ongoing construction of parking lot at Dikshabhoomi
सध्या नागपुर येथील पवित्र दिक्षाभूमी येथे सुरू असलेले पार्कीगचे बांधकाम चालु असुन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या पवित्र दिक्षाभूमी च्या दृष्टीने अतिशय घातक आहे. आंबेडकरी अनुयायासाठी दिक्षाभूमी स्मारक फक्त नसून आमचे प्रेरणा स्थान,क्रांतिभूमी, उर्जाभूमी आहे .हे षडयंत्र येथील आंबेडकरी समाज कदापि खपवून घेणार नाही म्हणुन दिक्षाभूमीचे पवित्र राखण्यासाठी हे काम तात्काळ बंद करण्यात यावे अन्यता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे तीव्र पडसाद उमटतील याची दाखल शासनाने घ्यावी असा इशारा देण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संघपाल कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संतोष जीवने समता सैनिक दलाचे उमरे रा.वि.नगराळे,एन.जि. भगत डोंगरसिंग खोब्रागडे,अनिल रामटेके,निखील टिपले,अशोक निमसरकार,सुरेश हुमे,दीक्षांत वासनिक,महेंद्र वानखडे,शामराव मुनेश्वर,मधुकर सातपुडके,संतोष ओमकार,प्रफुल राउत पद्माताई खोब्रागडे,करूणा नरांजे,शशिकला नैनपार,मंदाबाई नगराळे,रंजना हुमे,नीलम रामटेके,सानिका तुरे,मंदा कार्मंनकर,नालंदा मुनेश्वर,आंबेडकर नगर,वसंत नगर,गाडगे बाबा नगर खापरी,नेहरू नगर व घाटंजी येथील महिला व पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते...प्रमुख मागण्या :-
१) नागपुर येथील पवित्र दिक्षाभूमी येथे सुरू असलेले पार्कीगचे बांधकाम तात्काळ रद्द करण्यात यावे .
२) दीक्षाभूमी आधी होती तशीच येणाऱ्या १४ ऑक्टोबर २४ पूर्वी पूर्ववत करण्यात यावी .
३) दीक्षाभूमी विद्रूप परण्याची संमती देणाऱ्या सध्याची स्मारक समिती बरखास्त करण्यात यावी .
0 comments:
Post a Comment