Ads

बेपत्ता मिथिल रेल्वे पोलीसांच्या ताब्यातMissing Mithila Railway police in custody

सादिक थैम वरोरा:सोमवारी रात्री एक वाजता च्या दरम्यान घरातून अचानक बेपत्ता झालेला दहा वर्षाचा चिमुकला मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तेलंगणा राज्यातील मंचेरीयल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना सापडला.
Missing Mithila Railway police in custody
         सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मिहीरला आणण्यासाठी वरोरा पोलीस व मिथिल चे नातेवाईक मंचेरियलला गेले होते. रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या महिला त्यांनी आपल्या ताब्यात घेऊन आज परोरा येथे पोहोचले व मेहेरला त्याच्या आईच्या स्वाधीन केले

. वरोरा शहरालगत असलेल्या साकार नगर एकार्जुना येथे मिथिल सुहास मेश्राम हा दहा वर्षाचा चिमुरडा आपल्या आई जवळ  राहत होता. सोमवार आठ जुलैला रात्री 1 वाजता च्या सुमारास  तो अचानक घरातून बेपत्ता झाल्याचे  लक्षात आले. रात्रीच त्याचा इतरत्र शोध घेतला मात्र तो दिसून न आल्याने  मिथिलच्या वडिलांनी वरोरा पोलिसात मिथिल हरविल्याची तक्रार नोंद केली. 
     तक्रार प्राप्त होताच वरोरा पोलीस ठाण्याला नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांनी दहा वर्षाच्या बेपत्ता झालेल्या मिथिल ची शोध मोहीम सुरु केली. मिथिल बेपत्ता असल्याची माहिती वायरलेस द्वारा संपूर्ण पोलीस स्टेशन येथे मिथिलच्या फोटोसह पाठविण्यात आली. अगदी काही तासातच वरोडा पोलिसांना मिथिल सुहास मेश्राम हा दहा वर्षाचा चिमूरडा तेलंगाना राज्यातील मंचेरियल जीआरसी रेल्वे स्थानकावर सेंट्रल रेल्वे पोलिसांना आढळला.

         रेल्वे पोलिसांनी तात्काळ बेपत्ता मिथिल मंचेरियल जीआरसी रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती वरोरा पोलिसांना दिली. वरोरा पोलिसांनी मिथिलच्या आई-वडिलांना माहिती देत मिथिलला घरी परत आणण्यासाठी पोलीस मिथिलच्या नातेवाईकासह मंचेरियलला लगेच रवाना झाले. मिथिलचा पत्ता लागल्याने व तो सुखरुप असल्याने मिथिलच्या आई- वडिलांनी सुटकेचा श्वास घेतला.
     त्याला घेऊन पोलीस आज बुधवारला वरोरा येथे पोहोचले व त्यांनी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. मिथिलचे आई-वडील विभक्त राहतात. याचा परिणाम त्याच्या मनावर झाला व तो आठ जुलै सोमवारला मध्यरात्री घरातून बाहेर पडला व त्याने रेल्वे स्टेशन  गाठले.मध्यरात्री आलेल्या  गाडीत बसून तो मंचुरियलला पोचला होता.  यापूर्वीही अशाच प्रकारे घरातून निघून गेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment