वरोरा: कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याने ६ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना आज ५ ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी ११.३० च्या सुमारास घडली.
वरोरा येथील हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एम एच 40 बी इ 1847 क्रमांकाचे मारोती कंपनीचे युको वाहन बोर्डा गावासमोर उलटल्याने त्यात तील ६ विद्यार्थी जखमी झाले.
जखमीमध्ये सुहानी बेंदले ,अनुष्का ठावरी, उर्वशी दातारकर, श्रद्धा डोळस सर्व राहणार पावना या विद्यार्थिनी व यश रोडे, प्रज्वल नामक विद्यार्थी राहणार धानोली हे जखमी झाले.
माहितीनुसार वरोरा तालुक्यातील धानोली येथील रोहित रोडे नामक 22 वर्षीय मुलगा चालवत होता.वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे बोर्डासमोरील एका वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने तीनदा पलटी मारली.अपघात होताच चालक गाडी सोडून वाहन सोडून पसार झाल्याचे वृत्त आहे.
जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात वरोरा दाखल केले त्यांचेवर उपचार करण्यात आले.
हे सर्व विद्यार्थी येथील हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. अपघाताचे वृत्त कळताच महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य व प्राचार्य महेश डोंगरे यांनी रुग्णालयात धाव घेतली व जखमींना सहाय्य केले.
हिरालाल लोया विद्यालय हे मुख्य रस्त्यालगत असून यावरून वाहनचालक वाहन वेगात चालवत असतात. त्यामुळे या विद्यालयाच्या समोर वेग नियंत्रक लावणे गरजेचे आहे.अन्यथा एखाद वेळेस मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0 comments:
Post a Comment