जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून भद्रावती शहरात मानवी अधिवासात मोकळ्या स्थितीत वावरणाऱ्या एका मोराचा भरारी मारताना जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला.सदर घटना शहरातील जुना बस स्थानक परिसरात घडली.
Peacocks die of electrocution.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सदर मोर हा गेल्या पाच सहा महिन्यांपासून भद्रावती शहरात वनविभाग कार्यालयाच्या परिसरात वास्तव्यास होता व या परिसरात मुक्त विहार करीत होता.घटनेच्या दिवशी हा मोर जुना बस स्थानक परिसरात विहार करीत असताना व भरारी घेताना परिसरातील 11 केवी विद्युत ताराला स्पर्श होऊन तारांना चिकटला व त्यात त्याचा मृत्यू झाला. वीज वितरण विभागाच्या सहकार्याने सदर मोराचा मृतदेह खाली काढण्यात आला व घटनेचा पंचनामा वनविभागातर्फे करण्यात आला. नेहमी आढळणाऱ्या या मोराचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिकात हळहळ व्यक्त होत आहे.
0 comments:
Post a Comment