Ads

गोंडपिपरित पिक विमा आढावा बैठक संपन्न

गोंडपिपरी - राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली.पीक विम्याचे काम सांभाळत असलेल्या कंपन्या छोटी-मोठी कारणे समोर करून पिक विम्याचे दावे खारीज करीत असल्याचे चित्र आहे 23- 24 सत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील पिक विमा काढलेल्या 69 हजार 244 शेतकऱ्यांचे दावे पीक विमा कंपनीने खारीज केले यावर कृषी विभागाने आक्षेप घेतला आहे.
Farmers held crop insurance officials on edge
गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती ,निसर्गाचा लहरीपणा याचा मोठा फटका शेत पिकांना बसत आहे.पिकांना संरक्षण मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने पीकविमा योजना सुरू केली गेल्या काही वर्षांपासून हेक्टरी रकमेची अट शिथिल करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे .त्यात गेल्या दोन वर्षापासून राज्य शासनाने केवळ एकूण एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे .पिक विमा योजनेची कामे जिल्हा निहाय इन्शुरन्स कंपन्यांना देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे काम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे सोपवण्यात आले.अशा स्थितीत गोंडपिपरी तालुक्यातील ४१०२ शेतकऱ्यांचे दावे विमा कंपनीने खारीज केले.आज तहसील कार्यालय व तालुका कृषी विभागाने डी येड कॉलेज येथील सभागृहात दि २ शुक्रवांरी आढावा बैठक ठेवण्यात आली.या वेळी तहसीलदार शुभम बहाकर,तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे,दिनेश लडी जिल्हा सल्लागार विमा कंपनी, तलाठी दीपक झाडे, साईकिरन आऊलवार नायब तहसीलदार,अनिकेत चावरे यांची उपस्थिती होती.शेतकऱ्यांतर्फे सरपंच देविदास सातपुते,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,प्रवीण धोडरे,काँग्रेस शहर अध्यक्ष राजू झाडे,बंडू गौरकार,पारगाव येथील शेतकरी विरुटकर,संजय माडूरवार यांनी प्रश्न मांडले.यावेळी शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
येत्या पाच ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाची पिक विमा कंपनीसोबत बैठक होणार आहे या बैठकीतून तोडगा निघेल आम्ही सुधा शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारी जिल्हा स्तरावर पोहचवू
- शुभम बहाकर ,तहसीलदार गोंडपिपरी
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment