सादिक थैम :वरोरा-भद्रावती तालुक्यातील "वारी प्रबोधनाची" रथयात्रा नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृवा मध्ये अखेर 29 दिवसांच्या प्रवासानंतर उत्साहात संपन्न झाली, आणि तिचा समारोप तुळाना येथे 21 सप्टेंबर उत्साहाने पार पडला. या प्रबोधन वारीने 247 गावांना भेट दिली, ज्यात अनेक सेवाभावी गुरुदेव सेवकांनी तन, मन, धन अर्पण करून सहकार्य केले.
"Vari Prabodhnachi" Chariot Yatra of Warora Bhadravati Taluka ends in Tulana Village
रथ यात्रेची सुरुवात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळ गुरुकुन्ज मोझरी येथून सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले होते. वारी प्रबोधनाची हे संपूर्ण विदर्भात रवी दादा मानव, इंजि. भाऊ साहेब थुटे, गव्हाळे महाराज, राज दादा घुमणार, प्रदीप पाल महाराज, उदयपाल महाराज, आशिष माणुसमारे महाराज, कुत्तारमारे महाराज, विशाल गावंडे महाराज, मोहनदासजी चोरे, ह. भ. प. सुवर्णताई पिंपळकर, प्रकाश पिंपळकर, आत्राम महाराज, काळे गुरुजी यांच्या नेतृत्वात फिरत आहे.
वारिमध्ये ग्रामगितेचे महत्व, सामुदायिक प्रार्थना सुरुवात, गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करणे, शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या विविध योजनांची माहिती देणे, शेतीला पांदण रस्ता प्राधान्याने करण्यात यावा यासाठी पांदण रस्ता अभियानाची सुरुवात करणे व्यसनमुक्ती अभियान राबविणे, स्वच्छता अभियान राबविणे, सुसंस्कार शिबिराचे महत्त्व समजावून सांगणे, मोबाईलचे दुष्परिणाम व फायदे समजून सांगणे इत्यादी विषयांवरती समाज प्रबोधन करण्यात आले.
तुळाना येथील ग्रामस्थांनी रथयात्रेचे भव्य -दिव्य स्वागत केले. सामुदायिक प्रार्थनेने समारोप कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक राष्ट्रीय कीर्तनकार इंजि. भाऊसाहेब थुटे, श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलचे संचालक श्री रविदादा मानव, शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष श्री नरेंद्रदादा जीवतोडे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे युवा प्रबोधनकार राजदादा घुमनर.जेष्ठ प्रचारक श्री देठे गुरुजी, अस्वले सर.गोवर्दिपे काकाजी,माणिक भाऊ डुकरे,कवडू वाडस्कर,दिलीप भाऊ भोयर,दादा पाटील झाडे, श्री अत्राम जी, वैद्य बाबू, सौ अर्चना ताई जीवतोडे,सौ मत्ते ताई,.गावातील पोलीस पाटीलधेंगले, ,श्री पुंडलिक मिलमिले ,राजू दाहुळे,श्री विजय ठेंगणे सुभाष भाऊ, मारोती पा.दरेकर, रामचंद्र उमरे, दत्तु गंधारे , पुंडलिक मिलमिले .नानाजी चरुरकर, गंगाराम दरेकर, विजय ठेंगणे,रामाजी वतारी , देवेंद्र डाहुले ,लहान मुले 50, सुमित्रा बाळकृष्ण दरेकर, मनिषा ढेगळे, सरपंच,पु.पा. बंडु ढेगळे गुरुदेव सेवा मंडळ,व ग्राम वासी व बाल उपासक व संस्कार शिबिर विद्यार्थिनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुप मेहनत घेतली...श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ..उपस्थित होते. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
या यात्रेदरम्यान, प्रबोधन वारीने वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील 247 गावांमध्ये विविध प्रबोधन कार्ये केली. यात ग्रामगीता प्रणित आदर्श ग्राम निर्मिती, श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना, आणि बंद पडलेल्या सामुदायिक प्रार्थनांचा पुनरारंभ यांचा समावेश होता. अनेक गावांमध्ये तरुणांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला. तसेच, ग्रामसभेचे प्रात्यक्षिक दाखवून आणि अधिकारांची जाणीव करून देण्यात आली. दुर्गम भागातील गावांमध्ये विविध योजनांची माहिती पोहोचवली गेली, ज्यामुळे त्या गावातील लोकांशी संवाद साधता आला.
यात्रेत मार्गदर्शन करणारे प्रमुख व्यक्ती म्हणजे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक राष्ट्रीय कीर्तनकार इंजि. भाऊसाहेब थुटे, श्री रविदादा मानव, श्री नरेंद्रदादा जीवतोडे, राजदादा घुमनर, आस्वले गुरुजी आणि इतर कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या वारीला सहकार्य केले.
गुरुदेव भक्तांच्या अथक परिश्रमांमुळे या प्रबोधन वारीने सामाजिक एकात्मता आणि संघटनेची शक्ती वाढवली आहे. भद्रावती आणि वरोरा तालुक्याच्या 29 दिवसांच्या प्रवासात वारीने लोकांमध्ये एक नवीन चेतना निर्माण केली असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार या यात्रेद्वारे व्यापक प्रमाणात झाला आहे. "वारी प्रबोधनाची" च्या माध्यमातून तालुक्यातील जनतेमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.
0 comments:
Post a Comment