जावेद शेख भद्रावती:-ओबीसी OBC प्रवर्गातील आपल्या उन्नती पासून दूर असलेल्या सोनार समाजाच्या उत्थानासाठी राज्य शासनाने संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून न्याय दिल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा सोनार समाज संघटनेने एका पत्रकाद्वारे राज्य शासनाचे आभार मानले आहे.
District Sonar Samaj Sangathan thanked the State Government for setting up the Economic Development Corporation.
सदर आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्याबद्दल सोनार समाजाची आर्थिक तथा अन्य क्षेत्रात प्रगती साधल्या जाईल असा विश्वास सदर पत्रकातून जिल्हा सोनार समाज संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी संघटनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सोनार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चावरे, जिल्हा कार्याध्यक्ष अड.प्राशीष ताठे, जिल्हा महासचिव संदीप चावरे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा ढोमणे, महिला जिल्हा महासचिव वृषाली पांढरे, भद्रावती सोनार समाज संयोजक सुभाष रोकडे, तालुका अध्यक्ष विजय चित्रीव, उमेश कुर्वे, अनंता ताठे, मोहन पांढरे, किशोर पांढरे, विनोद पांढरे, भद्रावती महिला अध्यक्ष कल्पना रोकडे, भारती पांढरे, भूमिका रोकडे, रेणू कडाने, लता म्हस्के यांच्यासह सर्व समाज बांधवांनी राज्य शासनाचे अभिनंदन करून आभार मानले आहे.
0 comments:
Post a Comment