जावेद शेख भद्रावती:- भद्रावती, राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही तालुक्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात भद्रावती येथील ठाणेदारपदी अमोल काचोरे यांची नियुक्ती करण्यात आली ते दोन दिवसा अगोदर भद्रावती येथे रुजू झाले आहे.
New Police Inspector Amol Kachore joins Bhadravati
तत्कालीन ठाणेदार बिपिन इंगळे यांची बदली वर्धा येथे करण्यात आली आहे.यापूर्वी अमोल काचोरे नागभीड येते पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते,त्यानंतर त्यांना वरोरा पोलीस स्टेशनची ठाणेदार म्हणून जबाबदारी देण्यात आली होते.नवीन ठाणेकरांन पुढे भद्रावती तालुक्यातील व शहरातील अवैध धंदे गांजा तस्करी, सट्टा पट्टी,कोळसा तस्करी,रेती तस्करी,अवैध दारू विक्री, शहरातील वाढते चोरीचे प्रमाण हे सर्व आव्हानने आहेत. या सर्व बाबींवर लवकरच आळा बसविण्यात येईल व कोणतेही अवैध धंदे चालू देणार नाही अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली. पोलीस प्रशासनाला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार अमोल काचोरे यांनी केले.
0 comments:
Post a Comment