चंद्रपुर :-आज जैन मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेने माता महाकाली महोत्सवाला Mata Mahakali festival सुरवात झाली आहे. सराफा असोसिएशनच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. जैन मंदिर येथून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रा आमदार किशोर जोरगेवार MLA Kishore Jorgewar यांच्या निवास्थानी पोहल्यानंतर आ. जोरगेवार यांनी सपत्निक दर्शन घेतले.
Mata Mahakali's procession begins
पाच दिवस चालणार असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाला आज पासून सुरवात झाली आहे. सकाळी 9 वाजता सराफा असोशिएशनच्या वतीने जैन मंदिर येथुन शोभायात्रा काढली होती. या शोभायात्रेत माता महाकालीची चांदीची उत्सव मुर्ती ठेवण्यात आली होती. सदर शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दाखल झाली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहपत्नीक मातेची पूजा करुन शोभायात्रेत सहभाग घेतला. सदर शोभायात्रा महाकाली महोत्सव पेंडालात पोहचल्या नंतर मुर्तीची विधीवत प्राणप्रतिस्थापना करण्यात आली.
0 comments:
Post a Comment