चंद्रपुर :- जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पथकांना आदेशीत केले होते."
पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने दिनांक 06/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा. येथिल अधिकारी व कैर्मचारी पो.स्टे. गोंडपिपरी हददीमध्ये पेट्रोलींग करीता असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, पुरूषोत्तम बळीराम कोसरे, वय- ४५ वर्ष, धंदा-पान मटेरीअल विक्री रा. शिवाजी वार्ड प्रभाग क्र. ६ गोंडपिपरी, ता. गोंडपिपरी जि. चंद्रपुर हा आपले नातेवाईकाचे. घरी वार्ड नं. 02 गोंडपिपरी, ता. गोंडपिपरी, जिल्हा अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु बाळगुण विक्री करीत आहे अश्या खबरेवरून घरी छापा मारला असता घरी अंगणामध्ये अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु मिळुन आला वाहन व मुददेमाल असा एकुण 1,74,880/-रु. चा माल जप्त करून आरोपी विरूध्द पो.स्टे. गोंडपिपरी येथे अपराध कमांक 286/2024 कलम 223, 275, 123 भारतीय न्याय संहिता 2023, सहकलम 30 (2), 26 (2) (प), 26 (2) (पअ), 59 अन्न सुरक्षा आणी मानके अधि. गुन्हा नोंद करण्यात आला आहे. .
सदर कर्यवाही स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांचे मार्गदशनात पोउपनि. संतोष निभोरकर, पोउपनि. मधुकर सामलवार, पो.हवा. जयंत चुनारकर, नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पो. किशोर वाकाटे, अमोल सावे, चापोहंवा दिनेश अराडे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment