Ads

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत

चंद्रपुर :-आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी आज, रविवारी चंद्रपूर पोहोचले. यावेळी मोरवा विमानतळावर आमदार किशोर जोरगेवार यांनी पवन कल्याण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
Andhra Pradesh Deputy Chief Minister Power Star Pawan Kalyan was welcomed at the airport by MLA Kishore Jorgewar.
पावर स्टार पवन कल्याण यांचा दुपारी ३.३० वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ रोड शो होणार आहे. चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर आगमन होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे चंद्रपूरात स्वागत केले.
दुपारी ३.३० वाजता पवन कल्याण यांच्या रोड शोला बागला चौकातून सुरुवात होणार असून, बागला चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, तुकूम मार्ग, ट्रॅफिक ऑफिस, बसस्थानक मार्गे हा रोड शो एस.टी. वर्कशॉप येथे पोहोचणार आहे. येथे रोड शोचा समारोप होणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment