Ads

राज्यापुढील प्रश्न सोडविण्यासाठी ॲड. वामनराव चटप विधानसभेत हवेच- राजू शेट्टी

गोंडपिंपरी-गोंडपिपरी येथे दिनांक 16 नोव्हेंबर ला कन्यका मंदिर सभागृहात परिवर्तन महाशक्तीची जाहिर सभा झाली. विधानसभेच्या रणधुमाळीत शेतमालाला न मिळणारे भाव, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, प्रलंबित विकास कामांची पूर्तता आदी मुद्द्यांकडे लक्ष वेधून वामनरावांना संधी आपण दिली पाहिजे, यासाठी जात-धर्म आधी भेद विसरा असे आवाहन शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
Adv. Wamanrao must be in the Legislative Assembly immediately to solve the problems facing the state -- Raju Shetty
सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. वामनराव चटप, मुख्य वक्ते मा. खा. राजू शेट्टी, माजी आमदार उपेंद्र शेंडे, विदर्भवादी नेते अरुण केदार, रंजना मामुर्डे, सतीश दाणी, शालिकराव माऊलीकर, रामकृष्ण सांगडे, ॲड. प्रफुल आस्वले, आनंद खर्डीकर, ॲड. वासुदेव वासेकर, मनोज कोपावर, राजू चंदेल, सूर्यकांत भोजेकर, रमा कुरवटकर, मालन दुर्गे, रत्नमाला आस्वले आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, विधानसभेच्या रणधुमाळीत शेतमालाला न मिळणारे भाव, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, प्रलंबित विकास कामांची पूर्तता आदी मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकरी व ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी जात-धर्म यांचे भेद विसरून वामनरावांना विधानसभेत संधी देण्याचे आवाहन केले. पुढे बोलतांना राजु शेट्टी म्हणाले की, वामनराव हे माझे राजकीय गुरू आहेत. अभ्यासू मांडणी व शेतकरी प्रश्नांची जाण असणारा वामनरावांसारखा नेता चंद्रपूर जिल्ह्याला लाभणे हे भाग्यच. शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेत बुलंद करण्यासाठी वामनरावांची नितांत गरज आहे. मी आमदार असतांना त्यांचे धडे माझ्या सार्वजनिक जीवनात गिरविले आहेत. आदर्श असणारं नेतृत्व म्हणजे वामनराव चटप असून संपूर्ण राज्यातील शेतकरी चळवळीला बळ देणारा ठरेल, असे प्रतिपादन केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment