सावली :-सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव गावानजीकच्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात रेखा मारोती येरमलवार (५५) ही महिला ठार झाली.
Woman killed in attack by tiger lurking in forest
ही घटना शनिवार, ३० नोव्हेबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. येथील रहिवासी रेखा मारोती येरमलवार या शुक्रवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास झाडण्या कापण्यासाठी जंगलात गेली होती. नाल्याजवळ झाडण्या कापत असतात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. यात रेखा जागीच ठार झाल्या.आई घरी पोहचवली नाही म्हणून मुलगा महादेव येरमलवार व राकेश येरमलवार तथा गावकरी यांनी जंगलात रात्री शोध घेतला, पण कुठेही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान शनिवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता वनरक्षक सोनेकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नवनित कातलवार, व गावकरी यांनी जंगलात शोध घेतला असता रेखाचा मृतदेह जंगलात मिळाला.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद घेत वन विभागाने मृत महिलेल्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत दिली. तसेच वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकरी व नागरिकांकडून केली जात आहे.
0 comments:
Post a Comment