जावेद शेख भद्रावती :-अत्यंत गजबजीचे ठिकाण असलेल्या भद्रावती तहसील कार्यालया जवळील झुडपी मैदानात दिनांक 26 ला रात्रोच्या सव्वा दोन वाजताच्या सुमारास एक पूर्ण वाढ झालेले अस्वल शिरल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
या अस्वलाला शोधून त्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून रेस्क्यू मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. भाजयुमोचे इमरान खान हे आपल्या मित्रांना घरी सोडण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनाने शहरातील सुमठाना भागाकडे जात असताना रात्रो सव्वा दोन वाजता च्या सुमारात लगतच्या आयुध निर्माणीच्या संरक्षण भिंतीकडून हायवे ओलांडून एक अस्वल भद्रावती तहसील कार्यालयालगत असलेल्या झुडपी मैदानात शिरत असल्याचे त्यांना दिसले.त्यानंतर इमरान खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या भागात रात्रभर जागून नागरिकांना सावध करण्याचे काम केले. याची माहिती भद्रावती वन विभागाला दिल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह लगेच घटनास्थळ गाठून सकाळपासून अस्वल शोधून त्याचे रेस्क्यू करण्याची मोहीम सुरू केली आहे.
0 comments:
Post a Comment