राजुरा:- जि.प. उच्च प्राथमिक शाळा, चिंचोली(बू) राज्यस्तराकरीता
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या जिल्हा महाराष्ट्र शासनाच्या स्टार्स प्रकल्पाअंतर्गत जिल्हा स्तरीय हॅकेथान विज्ञान प्रदर्शनी मध्ये राजुरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा, चिंचोली (बू) ही शाळा तृतीय क्रमांक प्राप्त करून राज्य स्तरावर होणाऱ्या प्रदर्शनासाठी पात्र झाली आहे.
Z.P. Upper Primary School Chincholi (Bu.) won third place at the district level.
इयत्ता सातवी मधील विद्यार्थी अमन गोपाल डाहूले आणि अमन मनोज घोडमारे यांनी विज्ञान शिक्षिका रंजीता रामरतन चापले यांच्या मार्गदर्शनात अंध व्यक्तीसाठी स्मार्ट ब्लाइंड स्टिक आणि शूज ही प्रतिकृती तयार केली होती. विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता तयार करण्यासाठी एकविसाव्या शतकातील कौशल्याची रुजवनुक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , चंद्रपूर चे प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकाला सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. चिंचोली शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक अश्विनी सोनवणे , डायट प्राचार्य, राजकुमार हिवारे , गटशिक्षण अधिकारी राजुरा मनोजकुमार गौरकर , विस्तार अधिकारी हेडाऊ आणि केंद्रप्रमुख तेलकापल्लिवार यांनी चिंचोली शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राज्य स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
0 comments:
Post a Comment