Ads

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांची कारवाई.

जावेद शेख भद्रावती :-
मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी एका अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. illegal sand smuggling
Bhadravati police take action against a tractor involved in illegal sand smuggling.
सदर कारवाई दिनांक 6रोज मंगळवार रात्रला11 वाजता भद्रावती पोलिसांतर्फे करण्यात आली. या कारवाईत 5,000 रुपये किमतीची रेती व तस्करीसाठी वापरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत दोन लाख पाच हजार रुपये असा दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वाळू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर नाकेबंदी करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एम.एच. 34ap 1205 या ट्रॅक्टर वर कारवाई करीत ट्रॅक्टर मालक घनश्याम शेषराव उताणे राहणार मांगली व ड्रायव्हर विकासभीमराव कोटनाकेच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई ठाणेदार लता वाडिवे यांच्या मार्गदर्शनात गजानन तुपकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, रोहित चीटगिरे, योगेश घाटोळे यांनी केली. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment