सादिक थैम :- वरोरा तालुक्यातील शेतकरी यांनी आपला शेतमाल काढून 31मार्च पर्यंत पीक कर्ज भरून सरकारला मदत करावी, असे असतांना याचाच फायदा व्यापारी घेत असून शासन कायदा म्हणतात कि उच्चं दर्जा चा शेतमाल हमीभावाने व्यापारी यांनी खरेदी करावा, आणि 24 तासात शेतकरी यांना पेमेंट करावे परंतु या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आर्थिक भ्रष्टाचारा शिवाय शेतकरी यांच्या वाट्याला काय दिले
मागील कित्येक वर्षा पासून चणा नाफेड द्वारे खरेदी करण्यात येत होता मात्र या वर्षी अजून पर्यंत नोंदणीच सुरु झाली नाही तर चणा खरेदी कधी करणार असा प्रश्न शेतकरी यांनी उपस्थित केला असून तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात कांदा शेतकरी पिकवत नसून बनावट कागद पत्रे करून कांदा खरेदी दाखवून बिल उचलण्यात आली मात्र येथे हजारो क्विंटल शेतकरी चणा पिकवत असून तो शासन तसेच व्यापारी हमीभावाने खरेदी करत नाही आहे.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापारी हे शेतमाल हमीभावा पेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत असून या बाबत कायदा आहे मात्र सचिव या कायद्याला फक्त कागदावर दाखवत असून व्यापारी यांच्या सोबत हात मिळवणी करत आहे त्यामुळे वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकरी यांच्या वाट्याला दुःख येत आहे म्हणून आज संबंधित विषय घेऊन तालुक्यातील शेतकरी नेते श्री किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री चंद्रसेन शिंदे यांच्यामार्फत सरकारला चना भेट दिली, यावेळी तालुक्यातील शेतकरी, किशोर डुकरे तुलसी आलम,तुकाराम निब्रड, सुनील निब्रड, पुष्पाकार खेवले महेश वराडकर, लक्ष्मण आसुटकर, पुरुषोत्तम झाडे संदीप वासेकर, प्रतीक डुकरे आदी शेतकरी हजर होते.
शासकीय खरेदी करावी असे शासनाला कळविले आहे.शासनाची सूचना व पत्र आल्याशिवाय चण्याची आनलाईन नोंदणी करून खरेदी सुरू करता येत नाही. शेतकऱ्यांना भाव कमी वाटत असेल तर तारण योजनेत माल ठेवावा.शासनाचे पत्र आल्यानंतर आनलाईन नोंद करून माल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करू.
सचिव
श्री.चंद्रसेन शिंदे
कृषी उत्पन्न बाजार समिती ,वरोरा
0 comments:
Post a Comment