सातारा :-सौ. संगिता शिवाजी शिंदे यांची कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Mrs. Sangita Shivaji Shinde elected as Maharashtra State Women President of the Dutiful Police Mitra Foundation
कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन राष्ट्रीय कार्यकारिणीने अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अत्याचार व अन्यायग्रस्त महिलांना आधार देणे त्यांच्या त्यांच्या समस्या सोडवणे त्यांची तक्रार निवारण करणे अशा प्रकारे गेल्या चौदा वर्षात दीड हजार महिलांच्या सबलीकरणाचे काम संस्थेच्या माध्यमातून योग्य व यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. त्या अध्यक्ष- शेतकरी संघटना सातारा, तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष, भरारी बचत गट अध्यक्ष,पोलिस मित्र संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष, ह्यूमन राइट्स महाराष्ट्र कमिटी अध्यक्ष, सरपंच सेवा महासंघ सल्लागार, सातारा जिल्हा महिला तक्रार निवारण केंद्र सातारा अध्यक्ष, महिला समुपदेशन केंद्र सातारा, जय हिंद सेवा मशीन राष्ट्रीय संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष अशा पदावर काम करीत आहेत. त्यांच्या सामाजिक व महिला क्षेत्रातील दैदिप्यमान कामाची नोंद घेवून त्यांना अनेक पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment