Ads

ब्रह्मपुरीत गुरुदेव भक्तांचा आज शांती मोर्चा

चंद्रपुर :- भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील जमीन हस्तांतराच्या वादातून भु-वैकुंठ समिती व अखिल भारतीय संस्था, गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. याविरोधात अड्‌याळ टेकडीचे गुरुदेवभक्त सोमवारी (दि.21) ब्रह्मपुरीत शांती मोर्चा काढणार असून, लोकशाही मार्गाने अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
Peace march of Gurudev devotees in Brahmapuri today
सन 1967 मध्ये कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांनी अड्याळ टेकडीवर मौन साधनेद्वारे आध्यात्म, ग्रामगीत व ग्रामनिर्माण यांचा संगम साधणारा प्रयोग सुरू केला. गोरक्षण, विषमुक्त शेती, महिला आश्रम, अध्यात्म गुरुकुल, ग्रामोद्योग व योग-निसर्गोपचार यांसारखे उपक्रम येथे शेकडो गावांच्या लोकसहभागाने सुरू झाले. यामुळे अड्याळ टेकडी कार्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. या टेकडीवर संत तुकारामदादा गीताचार्य यांनी 1967 साली मौन साधनेच्या माध्यमातून आध्यात्मिक व सामाजिक कार्य सुरू केले. त्याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना आध्यात्मिक व सामाजिक जागृती देणे आणि ग्रामीण विकासाच्या कार्यात सहभाग वाढवणे होता. मात्र, या टेकडीच्या भूमीवर काही वाद निर्माण झाले आहेत, विशेषतः अखिल भारतीय संस्था, मोझरी यांच्याशी संबंधित. या संस्थेने या भूमीचे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे भु-वैकुंठ समितीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. अड्याळ टेकडीला एक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे, आणि त्यावर होणारे संघर्ष या ठिकाणच्या सामाजिक कार्यावर परिणाम करीत आहेत. 1973 मध्ये महाराष्ट्र शासन व वन महसूल विभागाने गट क्र. 19, 23, 185 अशी एकूण 39.07 एकर जमीन भु-वैकुंठ समितीला निर्वनीकरण करून ताब्यात दिली होती. त्या काळापासून आजपर्यंत समितीचा प्रत्यक्ष व कायदेशीर ताबा अबाधित आहे. तथापि, अखिल भारतीय संस्था, मोझरीने ही जमीन हस्तांतरित करून घेण्यासाठी अनेक दिवाणी दावे केले, जे न्यायालयाने फेटाळले. 12 डिसेंबर 2020 रोजी, मधुकर तुंडूलवार यांच्या माध्यमातून लोकन्यायालयातून ही
नेरी शुक्र दरम् अन पत्रे रस वि जी रुप
जमीन अखिल भारतीय संस्थेकडे गुप्तपणे हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप भु-
वैकुंठ समितीने केला आहे. त्याविरोधात त्यांनी नागपूर उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, प्रकरण न्यायप्रलंबित आहे. तहसीलदार ब्रह्मपुरी यांनी कोणतीही चौकशी न करता व नोटीस न देता 7/12 उताऱ्यावर मोझरी संस्थेच्या नावाने फेरफार केल्याने, मोझरी संस्थेने अतिक्रमणाचे प्रयत्न सुरू केले. याविरोधात भु-वैकुंठ समितीने अपील केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी, चिमूर यांनी फेरफार रद्द केला होता.

मात्र, याकडे दुर्लक्ष करून तहसीलदार सतीश मासाळ यांनी पुन्हा मोझरीच्या नावाने फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
*प्रशासनाकडून त्वरित कार्यवाहीची मागणी*
या पार्श्वभूमीवर गुरुदेव सेवामंडळ, अड्याळ टेकडी व हजारो भक्तगण 21 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजता मुरलीधर मंदिर, टिळक नगर येवून उपविभागीय अधिकारी कार्यालय, ब्रह्मपुरी येथे शांती मोर्चा काढून सामूहिक निवेदन सादर करणार आहेत, जर शासनाने त्वरीत योग्य कार्यवाही केली नाही, तर पुढे मोर्चा, उपोषण, धरणे आणि जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भु-वैकुंठ समितीचे ि संचालक सुबोधदादा, भाऊराव बावणे, बाबनरावजी अलगुळवार, पुंडलिक रोडे,सुभाष मेश्राम ,पुरुषोत्तम राऊत व समस्त गुरुदेव सेवकांनी पत्रकार परिषदेत दिला. गावागावातील भक्तांना शांती मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकशाही मार्गाने लढा देण्यासाठी मोठ्या संख्येने गावागावातील गुरुदेव भक्तांनी 21 एप्रिलच्या शांती मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment