Ads

युवकांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी दर्जेदार क्रीडा संकुल आवश्यक – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील क्रीडा संकुलांच्या अडचणी दूर करून युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली. या बैठकीत त्यांनी चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल, घुग्घुस तालुका क्रीडा संकुल आणि वीर बाबुराव शेडमाके अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी आवश्यक सुधारणा व निधी मंजुरीची मागणी केली आहे .
Quality sports complexes are necessary for youth to get opportunities at the national level – MLA Kishore Jorgewar
चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल हे मैदानी व इनडोअर खेळांसाठी उपयुक्त असूनही सध्या येथे अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतागृह, विद्युत रोषणाई, जलतरण पूल आणि खेळासाठी आवश्यक सामग्रीच्या कमतरतेमुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खेळाडूंच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे सदर बैठकीत आमदार जोरगेवार यांनी क्रीडा मंत्री यांना सांगितले.
घुग्घुस येथे प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलासाठी जागा अधिग्रहण आणि निधी वितरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या संकुलाच्या उभारणीसाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बैठकीत म्हटले आहे. तसेच, मौजा दाताळा येथे प्रस्तावित वीर बाबुराव शेडमाके अत्याधुनिक क्रीडा संकुलासाठी 16 एकर जागा आरक्षित करण्यात आली असून, या प्रकल्पासाठी लागणार्या निधीच्या मंजुरीसाठीही त्यांनी आग्रह धरला.
चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना उत्तम क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी योग्य तयारी करता यावी, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी यावेळी बैठकीत केली आहे .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment