Ads

पारंपारिक पद्धतीने साजरा केला घटे - खनके परिवाराने विवाह सोहळा.

राजुरा १९ मे:-
सध्या भर उन्हाळ्यात अनेक विवाह सोहळे संपन्न होत आहेत. एक अविस्मरणीय क्षण अनुभवता यावा म्हणून वर - वधू कडील मंडळी वाजतगाजत आणि मोठ्याप्रमाणात खर्च करून विवाह सोहळे संपन्न
Celebrated in a traditional manner
Ghate - Khanke family wedding ceremony.
करीत असताना राजुरा येथील नक्षत्र हॉल, चुणाळा रोड येथे रामपुर निवासी सौ. सुनंदा व श्री रामचंद्र धोंडूजी घटे यांचा सुपुत्र आकाश आणि बाबुपेठ येथील सौ. नीलिमा व दिलीपराव खनके यांची सुकन्या मानसी यांचा विवाह सोहळा अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी कोणत्याही प्रकारचा डिजे किंवा वाद्य न वाजवता वारकरी संप्रदायातील वारकरी भजन माऊली भजनी मंडळ, हिंगणघाट यांच्या टाळ मृदंग आणि भजनाच्या तालावर ठेका धरत हा अत्यंत अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे याच विवाह सोहळ्यात महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वस्तीगृहातील विद्यार्थांना ८० बेडशीट दान करण्यात आल्या. याच मे महीन्यात मुलगा आकाश व त्याचे वडील रामचंद्र घटे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या निवासी बाल सुसंस्कार शिबिराला दोन वेळचे अन्नदान व गोड पदार्थ दान करण्यात आले होते. यावेळी घटे - खनके परीवारासोबतच दिनकर गिरडकर, कोरपना, संतोष चन्ने, खामोना , योगेश अगळे, नागपूर , श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, मोहनदास मेश्राम , तालुका सेवाधीकारी, गुरूदेव सेवा मंडळ, राजुरा, इटनकर, वैरागडे, खनके, खामनकर अनेक सामजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठयासंख्येने उपस्थित राहून वर - वधुस शुभ आशिर्वाद दिले. रामचंद्र घटे यांना दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून खास परिचय असून त्यांना धार्मिक, सामाजिक कार्यात विशेष आवड आहे. वधू - वरांची अनोखी वेशभूषा व संपूर्ण स्टेज सजावट आकर्षणाचा विषय ठरले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment