सादिक थैम :-वरोरा तालुका प्रतिनिधी-ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि देशभक्तीचा जागर करण्यासाठी वरोऱ्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत आमदार करण देवतळे, रमेश राजूरकर, तसेच शहरातील भाजप पक्षाचे अनेक नेते, विविध संघटनाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Grand tricolor rally led by MLA Karan Deotale in warora
रॅली शहीद योगेश डाहुले चौक, वरोरा येथून निघालेली ही ऐतिहासिक यात्रा हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागानं शहराच्या मुख्य मार्गांवरून मार्गस्थ झाली. या रॅलीत महिलांपासून युवकांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून सामाजिक संस्थांपर्यंत सर्व स्तरांतील नागरिकांनी अभिमानाने आणि देशभक्तीच्या तेजाने एकत्र येऊन आपली एकता, स्वाभिमान आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
विशाल तिरंगा खांद्यावर घेऊन चालताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशप्रेमाचा आणि एकतेचा झळाळता प्रकाश दिसत होता. भारत मातेच्या घोषणांनी निनादलेलं हे दृश्य केवळ प्रेरणादायीच नव्हे, तर वरोऱ्याच्या अस्मितेचा अभिमान ठरलं.
विशेष म्हणजे, या यात्रेत माजी सैनिकांनी देखील आपल्या उपस्थितीने देशभक्तीला अभिमानाची सलामी दिली.ही तिरंगा यात्रा वरोऱ्यातील जनतेच्या एकतेने आणि सहभागाने निश्चितच ऐतिहासिक ठरली असून यात देशभक्तीची भावना जागृत झाली.
0 comments:
Post a Comment