राजुरा (प्रतिनिधी) – पंचायत समिती राजुरा येथील शिक्षण विभागाच्या वतीने दिनांक 30 एप्रिल, 2025 ला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात, मुख्याध्यापक सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये इयत्ता 5 व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या शाळांचा, तसेच राज्यस्तर विज्ञान प्रदर्शनात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी श्री हेमंत भिंगारदेवे,प्रमुख अतिथी श्री श्रीकांत भोयर, सहायक गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी श्री.मनोजकुमार गौरकार, विस्तार अधिकारी श्री सावन चालखुरे,श्रीमती मंगला तोडे, श्री विशाल शिंपी तसेच श्री सुनील चिकटे, श्री मसराम सर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास श्री रामा पवार, श्री प्रभाकर जुनघरे,कु किरण कामडी, श्री नारायण तेल्कापल्लीवार, श्री संजय त्रिपत्तीवार इत्यादी केंद्रप्रमुख,तालुक्यातील मुख्याध्यापक व गट साधन केंद्रातील विषय साधनव्यक्ती व विशेष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात गुणवत्ता पूर्ण शाळा इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती, निकाल विश्लेषण, आणि अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परीक्षेच्या तयारीसाठी शाळांना आवश्यक मार्गदर्शन,आले.
‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 3 व खाजगी व्यवस्थापन च्या 3 शाळांना गुणांणूक्रमे गौरविण्यात आले. यात जि प उच्च प्राथ शाळा चिंचोली खु., जि प प्राथ शाळा लाईनगुडा, जि प उच्च प्राथ शाळा चुनाळा म. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदयालय चिंचोली खु, प्रियदर्शनी विद्यालय रामपूर व रविंद्रनाथ विद्यालय अहेरी या
शाळांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर व हॅकेथान स्पर्धेत जिल्हा स्तरावर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या शिक्षकांना विशेष सन्मान देण्यात आला.यात जि प उच्च प्राथ शाळा पंचांळा,जि प उच्च प्राथ शाळा हरदोना खु व जि प उच्च प्राथ शाळा चिंचोली बु या शाळांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु ज्योती गुरनुले,श्री.राकेश रामटेके यांनी तर आभारप्रदर्शन श्री विशाल शिंपी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री मुसा शेख,कु रिता देरकर, श्री सूर्यकांत ढगे, कु गीता जांबुलवार, श्री देवेंद्र रहांगडाले, श्री आशिष बहादुरे,श्री राहुल रामटेके, श्री अजय सूर्यवंशी व सर्व विशेष शिक्षक इत्यादी नी सहकार्य केले.हा कार्यक्रम गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.
0 comments:
Post a Comment