Ads

वटपौर्णिमा निमित्याने श्री महिला बचत गटाच्या महिलांनी केले वडाच्या झाडाचे वृक्षारोपण.

राजुरा ११ जुन :-
वटपौर्णिमेचे अवचित्या साधून श्री महिला बचत गटाच्या महिलांनी चुनाभट्टी वार्डातील चिल्ड्रन्स पार्क येथे वडाच्या झाडाचे वृक्षारोपण केले.
On the occasion of Vat Pournima, the women of Shree Mahila Self-Help Group planted banyan trees.
यावेळी अश्विनी संतोष कोकोडे, सी. आर.पी., सोनाली दिवाकर चौधरी, अध्यक्ष, जयश्री संजय चौधरी, सचिव, लता रामदास चौधरी, सदस्य, रोशनी दुर्गे, सदस्य, संगिता कुळमेथे, आशा पेंदोर, द्रून धानोरकर आदी महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वडाच्या झाडाचे महत्व लक्षात घेता त्याचे जास्तीत जास्त वृक्षारोपण करून संवर्धन करण्याचे आवाहन या महीला गटाने केले. विविध सामाजिक उपक्रमात अश्विनी कोकोडे यांच्या नेतृत्वात हा गट सक्रिय सहभाग घेऊन कार्य करीत आहे. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन करतात. सोबतच प्रत्येक महीलेनी मोकळ्या जागेत, मंदीर परिसरात, गावांत, शहरात सुद्धा वडाचे झाड लावुन त्यांचे संवर्धन करावे असे मत महिलांनी व्यक्त केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment