Ads

दोन दिवसात दोन मजुराला मारहाण

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती - अवैध रेतीबाबत माहिती दिली यावरून मजुरास मारहाण
केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेतीच्या गाडीवर कामावर का नाही आलास म्हणून दुसऱ्या मजुराला मारहाण केल्याची घटना दिनांक २३ रोज सोमवारला घडली या प्रकरणात दोन्ही मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे अशा दबंगिरी करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य व त्याच्या मुलासह अन्य आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमीच्या नातलगासह गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
Two laborers beaten in two days
अनिल गायकवाड वय ३४ राहणार चंदनखेडा व दुसऱ्या घटनेतील निलेश संतोष गोहणे २५ व त्याची आई कुसुम संतोष गोहणे वय ४० राहणार चंदनखेडा असे जखमीचे नाव आहे यातील आरोपी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड त्याचे मुलगा रामेश्वर गायकवाड, गजू रणदिवे, विशाल गुंडीकवार, गणेश नं न्नावरे असे आरोपींची नावे आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड हा गेल्या कित्येक दिवसापासून या भागात रेती तस्करी करीत आहे या गावात या दोघा बाप लेकाची दहशत असून त्यांनी रेतीबाबत प्रशासनाला माहिती देणाऱ्या मजुराला मारहाण केली तर दुसऱ्या घटनेत रेतीच्या ट्रॅक्टर वर कामावर का आला नाही दुसऱ्या च्या कामावर का गेलास म्हणून मजूर व त्याच्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. या घटनेची भद्रावती पोलिसात तक्रार करूनही त्या आरोपीला अजून पावेतो अटक करण्यात आली नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी ची आई कुसुम संतोष गोहणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी चंदनखेडा सरपंच नयन जांभुळे , विकास धांडे, निकेश ढोक ,शुभम जांभुळे आधी उपस्थित होते .

[रेती तस्करी करणारा मारोती गायकवाड यांनी गावातील मजुराला मारहाण केली यापूर्वीसुद्धा त्यांनी शासकीय अधिकारी तसेच इतर व्यक्तीवर हल्ले केले आहे या व्यक्तीमुळे गावातील शांतता भंग होत आहे या व्यक्तीला चंदनखेळा गावातूनच तडीपार करण्याची मागणी प्रशासनाला करणार आहेत
नयन जांभुळे सरपंच चंदनखेडा
मारहाणी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे एका प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील पुढील तपास सुरू आहे

योगेश्वर पारधी ठाणेदार भद्रावती
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment