Ads

चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स ची सभा संपन्न.

राजुरा १९ जुलै :-
चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने सन २०२५-२६ या सत्राकरिता राज्य पुरस्कार सुधारित प्रवेश अर्ज भरण्याबाबत व अभ्यासक्रमातील बदल , संभावित जिल्हा मेळावा आयोजन, स्काऊट गाईडच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीच्या दृष्टिकोनातून स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन यांना विषयाची उजळणी होणे आवश्यक आहे करिता तालुका निहाय स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन यांचे उजळणी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्याबाबत आदी विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
Chandrapur Bharat Scouts and Guides meeting concluded.
चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे आयोजीत सभेला लक्ष्मणराव धोबे , चंद्रकांत भगत, जिल्हा संघटक स्काउट्स, दिपा मडावी, जिल्हा संघटीका, गाईड्स, यशवंत हजारे , सेवानिवृत्त माजी जिल्हा संघटक, स्काउट्स, किशोर ऊईके, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त, बादल बेले , प्रशांत खुसपुरे , नागेश सुखदेवे , किशोर कानकाटे , प्रमोद बाबळीकर , अविनाश जुमडे , शुद्धोधन मेश्राम , सीमा वादिले , विजयालक्ष्मी कुंडले , सीमा भसारकर , पुरुषोत्तम गायकवाड , रंजना किनाके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला स्काउट्स गाईड्स सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. सभेत अनेक विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. राजेश पाताळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर , अश्विनी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर तथा जिल्हा आयुक्त चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment