राजुरा २३ सप्टेंबर :-
५व्या चंद्रपूर जिल्हा टेबल टेनिस रँकिंग क्रीडा स्पर्धा वेकोली मनोरंजन केंद्र धोपटाळा राजुरा येथे नुकत्याच संपन्न झाल्या.उद्घाटनिय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश जावरे, संघटनेचे सचिव राकेश तिवारी, राष्ट्रीय खेळाडू मांडवकर, शंकर शुंकपा, रवि राजुरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर फरकाडे यांनी केले. दिनेश जावरे यांनी मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले व आयोजनाबद्दल संघटनेचे आभार मानले व भविष्यात अश्याच स्पर्धा आयोजित करण्यात याव्या असे म्हणाले. या स्पर्धेत ११ वर्षातील मुलांच्या गटात अद्वेत कुर्तोटवार प्रथम, एम.शशिधर द्वितीय, प्रज्वल मोरे तृतीय, मुलींमध्ये कु. केतकी खामनकर प्रथम, कु. आरोही मडावी द्वितीय, कु. शाश्वती नवरखेडे तृतीय क्रमांक पटकावला. १३ वर्षातील मुलांच्या गटात एम. शशिधर प्रथम, आराध्य कोटनाके द्वितीय, लक्ष चन्ने तृतीय, मुलींमध्ये कु. अन्वी नगराळे प्रथम, कु. राधिका सातपुते द्वितीय, कु. भावी सातपुते तृतीय क्रमांक पटकावला. १५ वर्षातील मुलांच्या गटात नैतिक आगलावे प्रथम, शौर्य राजुरकर द्वितीय, भानुआदित्य तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षातील मुलांच्या गटात श्लोक भेंडे प्रथम, दिक्षित रासुरी द्वितीय, मुलींमध्ये कु अनुष्का फरकाडे प्रथम, कु आरोही मडावी द्वितीय, कु. दिव्यांक्षी कुडमेथे तृतीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या खुल्या गटातील वैभव बल्की प्रथम, आदित्य शुंकपा द्वितीय, साई श्रीकांत तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर शुंकपा यांनी केले. आभार प्रदर्शन रवि राजुरकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी आयोजनासाठी सुहास महले, विजय रामटेके, संदेश धोटे, श्री सुनील खामनकर सहकार्य लाभले.
0 comments:
Post a Comment