राजुरा ८ एप्रिल :-
रोटरी क्लब ऑफ राजुरा द्वारा रोटरी उत्सव २०२६ चे आयोजन दिनांक ९ ते १४ एप्रिल पर्यंत राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.
Grand organization of the Rotary Festival 2026 in the city of Rajura.याविषयी रोटरी क्लब ऑफ राजुरा चे अध्यक्ष निखिल चांडक, सचिव राजू गोखरे, माजी अध्यक्ष कमल बजाज, सारंग गिरसावळे, सदस्य डॉ. अहेमद शेख, अजहर शेख, ॲड. जगजीवन इंगोले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या महोत्सवात विशेषतः स्थानिक गृहउद्योग, लघू उद्योग, हस्तकला, बचत गटांना प्राधान्य देण्यात आले असून अत्यल्प दरात त्यांना दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधील लावणी नृत्यात राजुरा येथील सहभागी झालेल्या महिला, विद्यार्थिनी यांची दि. ९ एप्रिल रोजी श्रीराम मंदिर जुना बसस्थानक राजुरा येथून सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढून उत्सव ठिकाणी रात्री ८ वाजता सामूहिक लावणी नृत्य सादर करण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी ६ ते ८ वाजता दरम्यान विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१० एप्रिल रोजी २० वर्षावरील फक्त महिलांकरिता मॉडेलिंग, फॅशन रॅम्प वॉक राहील यात प्रवेश निःशुल्क असेल. दि.११ एप्रिल रोजी समूह नृत्य स्पर्धा राहील याकरिता प्रवेश शुल्क पाचशे रुपये राहील. तर रात्री आठ वाजता तरुणाईच्या गळ्यातील ताईत "साधा माणूस" फेम विलास झट्टे हे या दिवसाचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. दि.१२ एप्रिल रोजी एकल नृत्य स्पर्धा राहील याकरिता प्रवेश शुल्क दोनशे रुपये असेल. दि.१३ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता यू ट्यूब स्टार रिचा साळवे हिची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शिवाय १४ एप्रिल पर्यंत चालणाऱ्या उत्सवात विविध दुकाने, मनोरंजन साधने, स्वादिष्ट खाद्य पदार्थ, तंबोला हौजी, खरेदी -विक्री दालन, छोटे मोठे झुले तसेच पेंटिंग, मेहंदी, रांगोळी, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना रोटरी उत्सव स्थळी स्टॉल्स लावायचे असेल त्यांनी निखिल चांडक ९०९६७५७२९०, कमल बजाज ९३२६८०४३८१, सारंग गिरसावळे ८३०८७४९६९५, जयवंत कोंडावार ९०९६३६१४१५, किशोर हिंगाणे ९९२१२११४२८, केतन जुनघरे ७७७६०९२३४० यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ राजुरा च्या वतीने करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment