जावेद शेख प्रतिनिधी भद्रवती /वरोरा : - आज सकाळी दहाच्या सुमारास वरोरा वरूनशेगावकडे दुचाकी वाहन जात असताना शेगावच्या अगोदर असलेल्या पद्मावार राईस मिल जवळ दुचाकी व विना नंबर ट्रॅक्टर ट्रॉली यांचा अपघात होवून दोन युवक गंभीर जखमी
झाले.यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होऊन एक युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली.Horrific Accident Involving a Tractor and a Two-Wheeler on the Shegaon-Chimur Highway
सविस्तर वृत्त असे की शेगाव बु. जवळ असलेल्या महालगाव येथील विना नंबर महिंद्रा कंपनीचे अर्जुन ट्रॅक्टर तसेच विना नंबर ट्रॉली ही राष्ट्रीय महामार्ग 353 ई वरून पद्मावर राईस मिल कडे वळण घेत असताना दोन युवक विना हेल्मेट दुचाकी एम,एच, 34 बी,एस,1887 ने वरोरा वरून शेगाव कडे येत असताना समोरासमोर धडक बसून हा अपघात घडला यावेळी प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून दुचाकी अतिशय वेगात असल्याकारणाने सरळ ट्रॅक्टर वर येऊन आदळली, दुचाकी वाहन ट्रॅक्टरच्या समोरील चाकाच्या मागे फसली या मध्ये दोन्ही युवक गंभीर रित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ पंचनामा केला असून ट्रॅक्टर हा स्वप्नील बदकी महालगाव यांच्या मालकीचे असल्याचे दिसून आले,दुचाकी वरील जखमी स्वामी मलय्या यमलु वय 34 वर्ष व संतोष राजू पवार वय 18 वर्ष दोन्ही राहणार भद्रावती. दोन्ही गंभीर जखमी युवकांना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले असता यातील स्वामी मलय्या यमलु यांना डॉक्टरा़नी मृत घोषित केले असून संतोष पवार ला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातामुळे परत एकदा शेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे, शेगाव हे तालुक्यातील मोठे गाव असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परंतु या ठिकाणी अनेक वर्षापासूनप्रशासनाकडून कोणतेही प्रकारे सुविधा केलेल्या नसल्यामुळे शेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र अपघात व्यक्ती करीता नाममात्र राहिले आहे,याठिकाणी पूर्णपणे सुविधा उपलब्ध असते तर जखमींना वरोरा येथे हलवण्याची वेळ आली नसती व वेळेवर उपचार मिळाल्यामुळे कदाचित मृताचे प्राण वाचले असते.
शेगाव परिसरात मोठ्या अवैध वाहतूक करणारे 95% पेक्षाही ट्रॅक्टरवर, ट्रॉलीवर नंबर टाकलेला दिसून येत नाही परंतु परिवहन विभाग याकडे कुठे जाणीवपूर्वक काना डोळा करत नाही? ना असा प्रश्नचिन्ह काही प्रमाणात उपस्थित होत आहे.
या घटनेचा अधिक तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुमित कांबळे करीत आहे.
0 comments:
Post a Comment