भद्रावती जावेद शेख : मौजे बरांज तांडा येथे बेकायदेशीर दारू निर्मिती व विक्रीविरोधात परिविक्षाधीन अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली धडक कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत तीन ठिकाणी छापे टाकून तब्बल २६०० लिटर गुळाचा सडवा आणि ६५ लिटर गुळांबा दारू, असा एकूण २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Combing operation of probationary officer Sachin Khetre!
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने बरांज तांडा परिसरात छापा टाकला. या कारवाईत सुनीता रवी पाटील (३७) हिच्याकडून ६०० लिटर गुळाचा सडवा व ५ लिटर गुळांबा दारू, भद्रीबाई इराय्या पवार (५५) हिच्याकडून ४०० लिटर गुळाचा सडवा व २० लिटर गुळांबा दारू, तर बाली रवींद्र इस्लावत (४०) याच्याकडून तब्बल १००० लिटर गुळाचा सडवा व ४० लिटर गुळांबा दारू जप्त करण्यात आली.
या तिन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ₹२,११,००० असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचांसमक्ष जप्तीची कारवाई करण्यात आली असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे बरांज तांडा परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. परिविक्षाधीन अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईची परिसरात चर्चा होत आहे.
या कारवाईत एपीआय विरेंद्र केदारे, पीएसआय संतोष केदार, पो.हवा. प्रशांत शेंद्रे, विजय तलांडे, देवानंद डुकरे, गोपाल अत्कुलवार, पो.अंमलदार प्रेम बावनकर व योगेश घुगे यांनी सहभाग घेतला.
0 comments:
Post a Comment