पुणे/प्रतिनिधी:20 जानेवारी पासून वाढले
पोल्ट्री फिड कंपनीचे भाव
आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या मक्याला अळीने लक्ष्य केले.ऊस व ज्वारीवरही तिचा प्रादुर्भाव आढळला आहे.याचा थेट परिणाम कुक्कुटपालन व डेअरी व्यवसायावर थेट परिणाम होत आहे.
सोयाबीन आणि मक्याचे भाव वाढल्याने
खाद्य विक्रीवर परिणाम
राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते प्रतिक्विंटल ३८०० रुपयांपर्यंत गेले आहेत. इराणकडून वाढलेली मागणी, मक्याचे भडकलेले दर आणि मध्य प्रदेशात भावांतर भुगतान योजनेची सांगता यामुळे सोयाबीनचे दर वधारले आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी ही योग्य दरपातळी आहे, किमान निम्मा माल या किमतीला विकून टाकणे शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनला प्रतिक्विंटल ३४०० रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली. परंतु नोव्हेंबरमध्ये राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३१०० ते ३३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. दिवाळीच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना मातीमोल भावात सोयाबीन विकावे लागले होते. ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या आशेने माल साठवून ठेवला, त्यांना याचा लाभ होणार आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध घातल्यामुळे इराणने भारताकडून वस्तुविनिमय पद्धतीनुसार तेलाच्या बदल्यात सोयापेंड, साखर, तांदूळ आदी शेतीमालाची खरेदी करण्याचे मान्य केले. त्याचा फायदा सोयाबीनला झाला. गेल्या तीन महिन्यांत इराणकडून सोयाबीनची मागणी सातत्याने वाढत आहे. तसेच दुष्काळ आणि अमेरिकी लष्करी अळीचा प्रादुर्भाव यामुळे देशातील मका उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगाकडून सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यांत जमा करण्याची तरतूद असलेली भावांतर भुगतान योजना राबवली होती. त्यामुळे तिथे आवक प्रचंड वाढून भाव कोसळले. त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला. या योजनेचे या आठवड्यात सूप वाजणार असून, त्यामुळे बाजारातील फुगवटा कमी होणार आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून राज्यात सोयाबीनच्या दरात उसळी आली आहे.
‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुकूल घडामोडी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी यामुळे सोयाबीनचे दर ३८०० रुपयांपर्यंत गेले आहेत. हंगाम संपेपर्यंत या दरात आणखी १०० ते २०० रुपयांची वाढ होऊ शकते, परंतु तोपर्यंत माल साठणवुकीचा खर्च आणि व्याज यांचे गणित केले तर आताच माल विकणे फायदेशीर ठरेल,'''' असे शेतीमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी सांगितले.
यंदा मराठवाडा-विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने ताण दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असली तरी अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाच्या गरजेइतका पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट अपेक्षित नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील सोयाबीन उत्पादनात १३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदा राज्यात ४३.८८ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची उत्पादकता १० टक्के वाढल्याचे दिसून येते. यंदा पीक चांगले असले तरी सोयापेंडची मागणी व निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असल्याने दरात पडझड होण्याची शक्यता नाही. राज्य सरकारने ‘नाफेड''च्या माध्यमातून सुरू केलेल्या सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे.
मागील हंगामात मक्याची एकट्या जळगाव जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवर लागवड झाली होती. आवक मार्चपासून वाढली. ती जूनअखेरपर्यंत कायम होती. कमाल दर १२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले होते. परंतु यंदा खरिपातील मक्यास १७०० पर्यंत दर मिळाले. सद्यःस्थितीत जे दर आहेत, ते २००० रुपये प्रती क्विंटल पेक्षा जास्त झाल्याने आता पशुखाद्यचे म्हणजेच कुक्कुपालन व्यवसायात लागणाऱ्या पशुखाद्यचे भाव कमी होणार नाही कारण मार्चपर्यंत आवक वाढणार नाही.मागील हंगामाच्या तुलनेत या रब्बीमधील मक्याचे दर किमान २००० रुपयांपर्यंत राहतील, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. जेव्हा मार्च अखेर भाव उतरणार नाही असे पक्के असल्याने पोल्ट्री फीडचे देखील भाव वाढणार नाही,त्याचे कारण पोल्ट्री फीड बनविण्यासाठी जास्तीत जास्त सोया आणि मका याचा वापर होतो.कच्चा मालाच्या किमती वाढत असल्याने याचा थेट परिणाम पोल्ट्री व्यवसाय आणि दुध डेअरी व्यवसायावर होणार असल्याने पोल्ट्री फार्मर्सची वाढली चिंता आणखीनच वाढली आहे.
पोल्ट्री व्यवसायात कोंबड्या मोठ्या झाल्यावरचा विक्री भाव आणि संपूर्ण खाद्य,देखरेख,औषध,यावर केलेला खर्च हा पोल्ट्री व्यवसायिकांना परवडणारा नसल्याने पोल्ट्रीफार्मिंग बंद होण्याच्या स्थितीत आहेत.सध्या महाराष्ट्रात कुक्कुटपाल पशुखाद्य बनवणारी न्युट्रीक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फार्मर्सची चिंता मात्र मिटलेली दिसत आहे. कारण या कंपनीच्या खाद्यची डिमांड गेल्या काही दिवसातच २००० टनहून अधिक वाढली आहे. कंपनीचे अधिकृत डीलर यशोधरा कामडी यांचेकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले, गेल्या काही दिवसात बाजारात जरी पशुखाद्य बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असतील तरी मात्र न्युट्रीक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या पशुखाद्याचा दर्जा घसरवला नाही,पहिले पासून आज परियंत आम्ही पोल्ट्री व्यवसायिकांना एकाच प्रकारचे खाद्य पुरवीत आलो असल्याने फार्मर्स ५० रुपये अधिक रक्कम जादा दराने देऊन न्युट्रीक्राफ्ट कंपनीचेच फीड घेत आहेत,याचा दुसरा फायदा सांगतांना कामडी म्हणाल्या संपूर्ण ब्याच विक्रीसाठी निघतांना फार्मर्सला संपूर्ण लागणारा खर्च वगळता बऱ्यापैकी फायदा होतो. त्यामुळे आज आमच्या खाद्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
पोल्ट्री फार्मर हे वारंवार फीड कंपनीला नफा कमवायच्या मागे लागले आहेत व यातून डीलर जास्त नफा कमविणार असल्याचे आरोप करतात.मात्र या संपूर्ण प्रकारावरून पोल्ट्रीफीड का महाग झाले याचे कारण समजू लागले आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्मर्सनी चांगल्या कंपनीचे खाद्य वापरावे व आपल्या उत्पन्नात वाढ करावी असे म्हटले.
संपर्क:९१७५९३७९२५
(सदर वृत्त हे सकाळ माध्यम समुहाच्या agrowon या वृत्तपत्रातून घेण्यात आले आहे.)
0 comments:
Post a Comment