चंद्रपूर/प्रतीनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यात सुशिक्षीत बेरोजगार युवकाच्या काही सेवा सहकारी संस्था कार्यान्वित आहेत. अशा संस्थांना काम मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर या कार्यालयाने जिल्हास्तरीय काम वितरण समितीची स्थापना यापूर्वीच करण्यात आली. त्या समितीच्या वतीने या कार्यालयात नोंदणी असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथील सुरक्षारक्षक व सफाईगाराचे काम वाटप करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या संस्थांनी 7 फेब्रुवारी 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधून कामाबाबतची सविस्तर माहिती जाणून घेवून अर्ज सादर करावे.
सदर सेवा सहकारी संस्थांकडून अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाण पत्र, बँकेचे पासबुक, सन 2017- 18 चा लेखापरिक्षण अहवाल व संस्थेचे पॅन कार्ड प्रत व सभासदांचे चालू असलेले सेवायोजन कार्ड, सभासद क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र व सुरक्षारक्षक परवाना सोबत जोडावा,असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment