Ads

ICC Men's T20 World Cup मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावर ऑनलाइन सट्टा; चंद्रपूरात LCB ची धडक कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल

ICC Men's T20 World Cup मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावर ऑनलाइन सट्टा; चंद्रपूरात LCB ची धडक कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल
चंद्रपूर : पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत सुरू असलेल्या ICC Men's T20 World Cup मधील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे.
Online betting on India-South Africa match in ICC Men's T20 World Cup; LCB takes strict action in Chandrapur, case registered against three
दि. 22.02.2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने रहमत नगर वॉर्ड, मसीहा लॉन जवळ छापा टाकला. यावेळी सय्यद हरीश उर्फ बिट्टू मुकद्दर अली (वय 30, रा. रहमत नगर, चंद्रपूर) हा आपल्या मोबाईलवर भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळताना आढळून आला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्र. 287/26 कलम 12(A) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा सह कलम 49 BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जप्त माल
मोबाईल फोन किंमत अंदाजे ₹20,000/-
ऑनलाइन जुगारासंबंधी स्क्रीनशॉट
एकूण जप्त मालाची किंमत ₹20,000/- इतकी आहे.
आरोपी
सय्यद हरीश उर्फ बिट्टू मुकद्दर अली (रा. रहमत नगर, चंद्रपूर)
इरफान कुरेशी (रा. हवेली गार्डन, चंद्रपूर)
अफजल शेख (रा. नागपूर)
ही कारवाई उपविभाग चंद्रपूर पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी संयुक्तरीत्या केली. पुढील तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment