- मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये होतेय फसवणूकीची भावना
- रिचार्ज बँलेंसकरिता लागतोय पैसा , ग्राहकातून संताप
खबरबात / धुळे
बळसाणे ( गणेश जैन ) वारे वा कंपनी वालो काय तुमची फसवेगिरी एकाबाजूने मोबाईल टू मोबाईल फ्री तसेच इंटरनेट सेवा फ्री अशी सेवा उपलब्ध असतांना काही मोबाईल कंपन्यांनी लाईफटाईम इनकमिंग सिमकार्ड खरेदी केलेल्या ग्राहकांना पुन्हा मोबाईल बँलेंस टाकण्याबाबत कंपनीकडून मेसेज पाठविण्यात आले आहेत कंपनीने ठरवलेल्या रक्कमेचा बँलेंस टाकला नाही तर पुन्हा कंपनी सिम बंद करण्याचा इशारा देत असल्याकारणाने कंपनीच्या सिमधारकांकडून संतापाची लाट निर्माण होत आहे उर्वरीत ग्राहकांचे तर मोबाईल च बंद पडले असून याबाबतीत जराशी ही कल्पना नसल्याने अशा ग्राहकांना ३५ रुपयांचा बँलेंस टाकण्याचा सल्ला दिला जात आहे ही ग्राहकांची फसवणूक असल्याचे ग्रामीण भागातील ग्राहकांकडून चर्चा होत आहे व कंपनीने लाईफटाईम इनकमिंग चे पैसे परत द्यावेत नाहीतर पहिलीच योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी विविध कंपनीच्या सिम धारकांकडून होत आहे मोबाईल च्या क्रांती नंतर सुरु चा कालखंड सोडल्यावर टेलीकाँम कंपन्यांनी मुप्त सेवा देण्याची सवय लावून ग्राहक तयार केले फ्री सेवा व आकर्षक रिचार्ज ने कंपनीने इंटरनेट ची आवड निर्माण केली एका प्रकारे मोबाईल धारकांना फ्री इंटरनेट चे व्यसन च लागले यातून च ग्राहक कंपनीच्या कचाट्यात सापडले गेलेत अजून कंपन्यांनी फोर जी सेवा सुरू केली कमीत कमी रिचार्ज मध्ये मोफत हायस्पीड इंटरनेट , मोबाईल ची सेवा देण्यात आली मात्र सध्याच्या परिस्थितीत काही टेलीकाँम कंपन्यांनी इनकमिंग काँलवर शुल्क आकारणी सुरु केली आहे एक हजार रुपयापर्यंतचे लाईफटाईम इनकमिंग काँलचे बँलेंस टाकल्यानंतरही परत दरमहा ग्राहकांना ३० , ३५ , ६५ , ९५ मोबाईल बँलेंस टाकावे लागणार आहे अचानकपणे घेतलेल्या निर्णयामुळे मोबाईल ग्राहकातून संताप उसळत आहे खाजगी कंपन्यांनी ग्राहकांना कुठल्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता काही ग्राहकांची फोन येण्या जाण्याची सेवा बंद केली याकाणाने मोबाईमधील बँलेंस च्या नावाखाली रिचार्ज कंपन्या साधारण ग्राहकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक व लूट करीत असल्याचा सूर ग्राहकातून निघत आहे
0 comments:
Post a Comment