नागपूर/प्रतिनिधी:
अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक ६ फेबुवारी रोजी दक्षिण आणि पश्चिम नागपुरातील काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
सकाळी १० ते दुपारी १ वेळेत रामकृष्ण नगर,अजनी चौक, देवनागरी,सावर्करनागर, विकास नगर,साई मंदिर परिसर, दंतेश्वरी, सुरेंद्र नगर, नेहरू नगर,संताजी कॉलेज परिसर, जयताळा, दुबे ले आऊट,दाते ले आऊट, प्रगती नगर,संघर्ष नगर ,शिवाजी नगर, हिल रोड,शंकर नगर, दीनदयाल नगर, पडोळे हॉस्पटिल, प्रताप नगर,गोपाळ नगर, गिट्टीखदान ले आऊट, सुभाष नगर,हिंगणा रोड, शास्त्री ले आऊट, जीवन छाया सोसायटी, रवींद्र नगर,हुडकेश्वर,चंदन शेष नगर, नरसाळा ,दुर्गधामणा,सुराबर्डी,वडधामना येथील वीज पुरवठा बंद राहील.
सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत नागपूर विद्यापीठ परिसर, हिल टॉप, देवतळे ले आऊट, वर्मा ले आऊट,उत्तर अंबाझरी मार्ग, पांढराबोडी अंबाझरी टेकडी, बजाज नगर,माधव नगर,श्रद्धानंद पेठ, डाग ले आऊट, कार्पोरेशन कॉलनी येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ९ ते १२ या वेळेत अजनी रेल्वे सॅटिन, मेडिकल कॉलनी, धंतोली येथील वीज पुरवठा मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बंद राहील. याच वेळेत भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, सोनेगाव,जयप्रकाश नगर,राजीव नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत रामदास पेठ परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.
0 comments:
Post a Comment