चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्त चंद्रपूरसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. सार्वजनीक जीवनात मोठ्या प्रमाणावर सुरुअसलेला प्लास्टिकचा वापर बंद करण्यास महानगरपालिका प्रयत्नरत आहे. आजघडीला बहुतेक घरी, व्यापारी केंद्रांवर, प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास व अन्य वस्तूंचा मोठय़ाप्रमाणावर वापर करण्यात येतो. यास प्रतिबंध करता यावा म्हणून यासाठी अभिनव उपक्रम म्हणून महानगरपालिकेतर्फे बंगाली कॅम्प, बस स्टँड, गोल बाजार येथे ३ प्लास्टिकसंकलन करणारे स्टॉल्स सुरु करण्यात येत आहे. चंद्रपूरकर आपल्या घरातील प्लास्टिकची विल्हेवाट लावता यावी याकरीता नागरिक आपल्या घरातील प्लास्टिक कचराया केंद्रावर दर रविवारी जमा करू शकतात. एक जागरूक नागरिक या नात्याने या मोबदल्यात त्यांना भेटवस्तू दिली जाणार आहे. या योजनेचा फायदा घेण्याकरिताकमीतकमी १ किलो प्लास्टिक नागरिकांना संकलन केंद्रावर दर रविवारी जमा करता येईल.
२३ जून, २०१८ रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती, प्लास्टिक पिशव्यांचा अतिवापर हास्वच्छता, प्रदूषणासह अनेक नागरी समस्यांच्या दृष्टीने आव्हान ठरले होते. या पिशव्यांची उपलब्धता आणि किंमत हे यामागील महत्त्वाचे घटक होते. बंदी घालण्यात आलेल्यावस्तूत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या व ८ इंच बाय १२ इंच आकारापेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरी बॅग) उत्पादन, विक्री व वितरणावर बंदी, २००मिलिपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच पिशवी, हॅन्डल असलेल्या - नसलेल्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल व एकदाच वापरल्याजाणाऱ्या डिस्पोसेबल वस्तू, अन्न पदार्थ पँकिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे भांडे व स्ट्रॉ, सजावटीसाठी वापरात येणारे प्लास्टिक व थर्माकोल यांचा समावेश आहे. प्लास्टिक बंदी कायद्यानुसार, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्यास पहिले ३०००, दुसऱ्यांदा ५००० व तिसऱ्यांदा २५,००० रुपये दंड व शिक्षेची तरतूद आहे
प्लास्टिक बदल्यात भेटवस्तू देणारे ३ स्टॉल्स / येत्या रविवारी १०.०२. २०१९ रोजी सकाळी १०. ०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत बंगाली कॅम्प, बस स्टँड, गोल बाजारयेथे असणार आहेत. एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्लास्टिक कचरा देणाऱ्या व्यक्तीला एक विशेष भेटवस्तू आणि "चॅम्पियन फॉर कॉज" पुरस्कार देऊन गौरविण्यातयेईल. चंद्रपूर महानगरपालिकेच्या " कचऱ्यातून भेटवस्तू " या योजनेचा सर्वांनी लाभ घेऊन आपले शहर प्लास्टिकमुक्त करण्यास योगदान द्यावे असे आवाहन पालिकेतर्फेकरण्यात येत आहे
दैनंदिन जीवनात वापरले जाणारे प्लास्टिक नैसर्गिकपणे नष्ट होत नाही त्याच्या विघटनास अनेक वर्षे लागतात. शंभर टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासमहानगरपालिका प्रयत्नरत आहे पण नागरिक म्हणून आपलेदेखील याबाबत काही कर्तव्य आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी हीसक्तीने न होता लोकसहभागातून व्हावी हा आमचा हेतू आहे, प्रत्येकाने मी कॅरीबॅगचा वापर करणार नाही, असा निर्धार केला, तर या समस्येतून मुक्तता होईल -
श्री. संजय काकडे, आयुक्त, चंशमनपा
0 comments:
Post a Comment