Ads

ताडोबा अंधारीत नाईट सफ़ारी सुरु

चंद्रपूर/ प्रतिनिधी

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मधील मोहर्ली बफर मध्ये आज दिनांक 01 फेब्रूवारी 2019 रोजी पासून नाईट पेट्रोलिग (नाईट सफारी) ची शुरूवात करण्यात आली.आजच्या पहिल्या नाईट सफारी च्या सदानंद नामक पर्यटकचे स्वागत वन परिक्षेत्र अधिकारी मोहर्ली बफर चे मून साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ताडोबा जंगला चा आनंद व वाघाचे दर्शन आता रात्री सुद्धा करता येणार आहे. या करीता आपण आपल्या स्वतःच्या चार चाकी गाड़ी ने देखील सफारी करता येईल किंवा आवश्यक असल्यास जिप्सी किराये ने मिळणार . नाईट सफारी मोहर्ली परिक्षेत्रातील पद्मापुर, मोहर्ली, कोंडेगाव वरील गेट वरुन करता येणार आहे. प्रत्येक गेट वरुन 5 गाड़ी ची एंट्री मिळणार आहे. एंट्री शुल्क 2000 रु प्रति गाड़ी , जिप्सी चार्ज 1500 रु., गाईड चार्ज 500 रु. आकारण्यात येणार आहे. सफारी वेळ रात्री 7.00 ते 10.00 पर्यन्त आहे. प्रत्येक गाड़ी सोबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा तील अधिकृत गाईड घेणे जरूरी आहे. नाईट पेट्रोलिग (नाईट सफारी) च्या बुकीग करीता मोहर्ली वन परिक्षेत्र मोहर्ली बफर ऑफिस किंवा इको टूरिज्म मैनेजर आगरझरी यांच्या कड़े  करता येणार  तसेच काही नियमाचा पालन करने आवश्यक आहे . मोठा सर्च लाइट सफारी च्या वेळी हाताळन्यास, धूम्रपान व मद्यपान करून सफारी करीता गेल्यास वन्यजीव अघिनियम 1972 च्या कायद्यानुसार कारवाही करण्यात येणार. असे मोहर्ली बफर आर. एफ. ओ. मून साहेबांनी माहिती दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment