अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम या विषयावर कारंजा येथील महाविद्यालाययात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती व राष्ट्रीय सेवा योजना रा.तू.म.नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवा जागृती अभियान 2018-2019 अंतर्गत अंधश्रद्धाचां समाजावर होणारा परिणाम या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कारंजा यांच्या आयोजनाखाली तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्ध्येचे आयोजन नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पी.जे काळे सर उद्घाटक प्राचार्य अंधारे हे तर प्रमुख पाहुणे अंनिस चे तालुका संघटक राजकुमार तिर्भाने , डॉ अमित याहूल .डॉ मेंढे ,बार्टी चे समतादूत विनायक भांगे, सिध्दार्थ सोमकुवर हे उपस्थित होते
यावेळी स्पर्ध्येचे मुल्यांकनाची जवाबदारी समतादूत सिध्दार्थ सोमकुवर व अंनिस सहसंघटक राणसिंग बावरी यांनी पार पाडली. या स्पर्ध्येत तालुक्यातील साक्षी सावरकर,प्रज्वल शिरपूरकर,कांचन बसिने,कोमल खवशी,भावना बंनगरे या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला यात प्रथम वैभव ढोबळे, द्वितीय लोकेश सोनोने व तृतीय कोमल खवसे यांनीं प्राविण्य प्राप्त केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अंकित खांडवे,उद्देश वाल गावकार,प्रेरणा सावरकर,पूजा हिंगवे,प्रेमीला भांगे,वैभव ढोबळे अपेक्षा वरकडे, वैभव ठाकूर, रश्मी हिंगवे व निशा नासारे यांनी अथक परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment