चंद्रपूर दि 29 एप्रिल: वैनगंगा नदीवरील पुलाचे बेअरिंगच्या दुरुस्तीच्या कामामुळे दिनांक 5 मे 2019 च्या सकाळी 6.00 वाजेपासून ते दिनांक 6 मे 2019 चे सकाळी 6.00 वाजेपर्यंत आरमोरी ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी हा 24 तासा करिता बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर यांनी दिली आहे.
ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी वरील वैनगंगा नदीवरील पुलाचे बेअरिंगच्या दुरुस्तीचे काम जनहितार्थ सुरळीत व तात्काळ पूर्ण व्हावे यासाठी हा महामार्ग 24 तासा करिता बंद ठेवण्यात येत आहे. यादरम्यान ब्रम्हपुरी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ब्रह्मपुरी- वडसा- आरमोरी या मार्गावरून वळविण्यात येत आहे. तरी नागरिकांनी याची खबरदारी घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी या मार्गावरून वाहतूक अथवा प्रवास न करता ब्रह्मपुरी वडसा आरमोरी या रस्त्यावरून वाहतूक अथवा प्रवास करावा, असे आवाहन नागपूर राष्ट्रीय महामार्ग विभागात तर्फे करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment