पीडित मुलीची पत्रकार परिषदेत माहिती
तक्रार देण्याकरीता दिले पाच लाखांचे आमिष
चंद्रपूर :-
मनसेचे राजू कुकडे, राजुरा येथील गोमती पाचभाई व चंद्रपूर येथील सुनिता गायकवाड यांनी पाच लाख रुपयांचे आमिष देऊन मला सुभाष धोटे व अरुण धोटे यांचा तक्रारीत नाव समावेश करावे यासाठी बळजबरी केली असल्याचा आरोप पीडित मुलीने श्रमिक पत्रकार संघाचे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडित मुलगी आदिलाबादला असताना सुनिता गायकवाड नावाच्या महिलेने तिला फोन केला की, आठ महिन्यापूर्वी झालेले प्रकरण आपण बाहेर काढू आणि त्याबदल्यात तुला पाच लाख रुपयाचे मदत देऊ आणि तुझे इतर नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश करून देऊ अशाप्रकारचे आमिष दिल्यानंतर ते तिच्या मोठ्या बहिणीने ऐकले. मोठ्या बहिणीने तिला चंद्रपूर येथे जाण्यास नकार दिला. तरी पण आमिषाला बळी पडून पीडित मुलगी चंद्रपूर येथे आली. चंद्रपूर येथे आल्यानंतर सुनिता गायकवाड हिच्या घरी मनसेचे राजू कुकडे, राजुरा येथील गोमती पाचभाई व इतर दोन मुले तिथे उपस्थित होते.
१८ मे ला मी तिथे आली मला केवळ जुने प्रकरण आपण उचलू अशा पद्धतीची विनंती करून बोलवण्यात आले. मात्र त्यानंतर तिथे पाहीले तर प्रकार वेगळाच होता. त्यांनी तुला संस्थाध्यक्ष सुभाष धोटे व संस्था सचिव अरुण धोटे यांच्याविरोधात तक्रार करावी लागेल. यासाठी मला बनविण्यात आले की, जर त्यांच्या विरोधात तक्रार केली तर तुझं शैक्षणिक नुकसान होणार नाही व ते तुला मदत करेल आणि केस वापस घ्यायला लावेल. आणि तुला पैसे पण मिळेल आणि तुझा इतर नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश होणार अशा पद्धतीचे आमिष मला देण्यात आले. तरीपण मी त्यांना असे करण्यास स्पष्ट नकार दिला. कारण त्यांनी कोणताही अशापद्धतीचा प्रकार केला नसून विनाकारण त्यांचे नाव लावण्याची माझी मनस्थिती नव्हती. उलट त्यांनी माझे प्रकरण झाल्याबरोबर गुरुराज कुलकर्णी या प्राचार्याला शाळेतून काढून टाकले होते. तरीपण मी त्यांच्या नावाची तक्रार कशी काय करू असे म्हटल्यानंतर मला रात्रभर त्यांच्या घरी मुक्कामी ठेवले राजू कुकडे यांनी कागदावर संगणीकृत लिखाण करून आणले. मला तू जे लिहिलं तुझे सांगितलं तेच मी लिहिलं अशा पद्धतीचे सांगून वाचायला न देता त्यावर माझी सही घेतली. आणि एसपी साहेबांकडे गेलो आणि तिथे तक्रार केली.
आज दिनांक 22 ला पेपर मध्ये व टीव्हीवर मी न्यूज बघितल्यानंतर मला कळले की मी अशा पद्धतीची कोणती तक्रार केली नसताना सुद्धा अशा पद्धतीचे पेपरला का आले आहे त्यामुळे माझ्या घरच्यांनी मला विचारले असता मी अशा पद्धतीचे बयान दिले नाही. आणि मला अशा पद्धतीने त्यांनी बळजबरीने हे करायला लावलं मला पाच लाख रुपये आमिष दिलं अशा पद्धतीचे मी घरी सुद्धा सर्वांना सांगितलं. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. रमजानच्या महिन्यामध्ये मी खोटे बोलणार नसून यामध्ये संस्थाध्यक्ष सुभाष धोटे, सचिव अरुण धोटे त्यांचा ड्रायव्हर व इतर कोणाचाही कसलेही प्रकारचा हस्तक्षेप नाही. करिता मी दिलेली ही प्रेसनोट अगदी बरोबर असून आपण आपल्या वर्तमानपत्रात व टीव्ही न्यूज चैनल वर देण्यास हरकत नाही ही विनंती.
0 comments:
Post a Comment