चंद्रपूर
राजुरा येथील काँग्रेस नेते व माजी आमदार सुभाष धोटे आणि त्यांचा भाऊ नगराध्यक्ष अरुण धोटे यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. राजुरा येथून रात्रीच त्यांना अटक करण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव बल्लारपूर पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं. धोटे बंधू संचालित नर्सिंग कॉलेजच्या एका विद्यार्थिनीने ही तक्रार केली होती. प्रकरण जुनं असलं तरी तक्रार काल दिल्यानं पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करून दोन्ही भावांना अटक केली. विशेष म्हणजे महिनाभरापासून राज्यभर चर्चेत असलेल्या राजुरा येथील एका शाळेतील आदिवासी मुलींवरील अत्याचार प्रकरणीसुद्धा या दोन्ही बंधूंवर जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल असून, जामीनावर ते बाहेर आहेत. पण आता या नव्या प्रकरणात शेवटी त्यांना अटक झाल्यानं काँग्रेसची मोठी बदनामी होत आहे.
0 comments:
Post a Comment