पंचायत समिती नागभीड अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिकमारा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापिका नंदा दामोधर सेलोकर नियत वयोमानानुसार 31 जुलैला सेवानिवृत्त झाल्यामुळे शाळेत साडी, शाल व श्रीफळ देऊन सत्कार व भावपूर्ण निरोप समारंभाचा कार्यक्रम तसेच सामाजिक ऋण व विद्यार्थ्याप्रति जिव्हाळा या भावनेने प्रेरित होऊन सत्कारमूर्ती तर्फे सर्व विद्यार्थ्यांना दोन नोटबुक व एक पेनचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशजी घोटेकर अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सत्कारमूर्ती नंदा सेलोकर, विशेष अतिथी एन. के. भानारकर, शिक्षण विस्तार अधिकारी, प्रमुख पाहुणे म्हणून कोर्धा केंद्राचे केंद्र प्रमुख राज एकवनकर, म्हसली केंद्राचे केंद्र प्रमुख टेमदेव नावघडे, शा व्य स. उपाध्यक्षा किर्तीताई गोंगल, बाबुराव भेंडारकर विद्यालयाचे मुख्याध्यापक पितांबर गोंगल, ग्रा. पं. सदस्य गणेश ठाकरे, संगीता घोटेकर, शा. व्य. समिती सदस्य बाळाजी देशमुख, जयश्री रडके, संगीता मेश्राम, योगिता देशमुख, तक्षशिला गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काकडे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचे नंदाताई सेलोकर यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संचालन दिलीप चंदनबावणे यांनी केले तर आभारप्रदर्शन माधुरी ननावरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊराव डोईजड, कांता राऊत व पुरुषोत्तम नंदगवळी यांनी अथक परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment