Ads
चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासाचे खरे शिलेदार सुधीर मुनगंटीवार – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

या पाच वर्षात चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासासाठी कधी नव्‍हे एवढा निधी

चंद्रपूर जिल्‍हा विकास प्रक्रियेत अग्रणी ठरेल – सुधीर मुनगंटीवार

महाजनादेश यात्रेचे मुल शहरात भव्‍य स्‍वागत

 






 इतिहासात चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासासाठी कधिही जितका निधी प्राप्‍त झाला नाही तेवढा निधी या 5 वर्षात प्राप्‍त झाला आहे. चंद्रपूर जिल्‍हयात सिंचन, कृषी विकास, रोजगार व स्‍वयंरोजगार, वनविकास, विद्यार्थी विकास, सांस्‍कृतीक विकास, क्रिडा, पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा, ग्रामविकास या सर्वच क्षेत्रात मोठया प्रमाणावर विकास झाला असून जिल्‍हयातील महानगरपालिका तसेच नगरपालिका व नगर पंचायतींना कधी नव्‍हे एवढा मोठया प्रमाणावर निधी विकासासाठी उपलब्‍ध झाला आहे. याचे श्रेय सर्वस्‍वी राज्‍याचे अर्थमंत्री व जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाते. सुधीरभाऊच या जिल्‍हयाच्‍या विकासाचे खरे शिलेदार असल्‍याचे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

दिनांक 5 ऑगस्‍ट रोजी मुल शहरातील कर्मवीर विद्यालयाच्‍या पटांगणात महाजनादेश यात्रेनिमीत्‍त आयोजित जाहीरसभेत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर जिल्‍हयाचे पालकमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, वनराज्‍यमंत्री डॉ. परिणय फुके, वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. संजय धोटे, आ. देवराव होळी, माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, मुलच्‍या नगराध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

 

यावेळी बोलताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्‍हणाले, आमच्‍या सरकारने या 5 वर्षात महाराष्‍ट्राला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर केले आहे. कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेस च्‍या सरकारला महाराष्‍ट्राचा विकास करणे शक्‍य झाले नाही. स्‍वतःच्‍या विकासातच ते मग्‍न राहिले. या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात महाराष्‍ट्र आघाडीवर आहे. आम्‍ही केलेली कामे घेवून जनतेशी संवाद साधण्‍यासाठी ही महाजनादेश यात्रा घेवून आम्‍ही निघालो आहे. महाराष्‍ट्रातील जनता आम्‍हाला पुन्‍हा एकदा महाजनादेश देईल, असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला.  

 

यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच वर्षात चंद्रपूर जिल्‍हयात झालेल्‍या विकासकामांची जंत्री उपस्थितांसमोर मांडली. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्‍हयाच्‍या सिंचनाच्‍या दृष्‍टीने वरदान ठरणारा चिचडोह प्रकल्‍प आपण पूर्ण केला असून कोटगल सिंचन प्रकल्‍पाचे लवकरच भूमीपूजन होणार आहे. जिल्‍हयाचे माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण व दुरूस्‍ती, पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना, चिचाळा व 6 गावांना सिंचन सुविधा पुरविण्‍यासाठी 23 कोटी रू. किंमतीची योजना, नलेश्‍वर मध्‍यम प्रकलपाचे काम अशी मोठया प्रमाणावर सिंचनाची कामे जिल्‍हयात झाली आहे. मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा निर्णय आमच्‍या शासनाने घेतला असून टाटा ट्रस्‍ट च्‍या सहाय्याने मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपूर, जिवती, गोंडपिपरी आणि नागभीड या तालुक्‍यांमध्‍ये सधन शेतकरी प्रकल्‍प आम्‍ही राबवित आहोत. चिचपल्‍ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, जागतीक दर्जाची वनअकादमी, बॉटनिकल गार्डन, देशातील अत्‍याधुनिक सैनिक शाळा, पोंभुर्णा तालुक्‍यात रोजगारासाठी कुक्‍कुटपालन व दुग्‍धव्‍यवाय प्रकल्‍प, टूथपिक उत्‍पादन केंद्र, अगरबत्‍ती उत्‍पादन केंद्र बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट, पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा, कॅन्‍सर हॉस्‍पीटल, मेडीकल कॉलेज अशी विकासकामांची दिर्घ मालिका आम्‍ही तयार केली आहे. पायाभूत सुविधांच्‍या माध्‍यमातुन हा जिल्‍हा समृध्‍द करण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही केला आहे. हा जिल्‍हा महाराष्‍ट्रात विकास प्रक्रियेत अग्रेसर ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला.

 

सभेचे संचालन जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले यांनी केले. सभेला मुल शहर व तालुक्‍यातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.  



चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासाचे खरे शिलेदार सुधीर मुनगंटीवार – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस या पाच वर्षात चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासासाठी कधी नव्‍हे एवढा निधी चंद्रपूर जिल्‍हा विकास प्रक्रियेत अग्रणी ठरेल – सुधीर मुनगंटीवार महाजनादेश यात्रेचे मुल शहरात भव्‍य स्‍वागत आजवरच्‍या इतिहासात चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासासाठी कधिही जितका निधी प्राप्‍त झाला नाही तेवढा निधी या 5 वर्षात प्राप्‍त झाला आहे. चंद्रपूर जिल्‍हयात सिंचन, कृषी विकास, रोजगार व स्‍वयंरोजगार, वनविकास, विद्यार्थी विकास, सांस्‍कृतीक विकास, क्रिडा, पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा, ग्रामविकास या सर्वच क्षेत्रात मोठया प्रमाणावर विकास झाला असून जिल्‍हयातील महानगरपालिका तसेच नगरपालिका व नगर पंचायतींना कधी नव्‍हे एवढा मोठया प्रमाणावर निधी विकासासाठी उपलब्‍ध झाला आहे. याचे श्रेय सर्वस्‍वी राज्‍याचे अर्थमंत्री व जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाते. सुधीरभाऊच या जिल्‍हयाच्‍या विकासाचे खरे शिलेदार असल्‍याचे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिनांक 5 ऑगस्‍ट रोजी मुल शहरातील कर्मवीर विद्यालयाच्‍या पटांगणात महाजनादेश यात्रेनिमीत्‍त आयोजित जाहीरसभेत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर जिल्‍हयाचे पालकमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, वनराज्‍यमंत्री डॉ. परिणय फुके, वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. संजय धोटे, आ. देवराव होळी, माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, मुलच्‍या नगराध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्‍हणाले, आमच्‍या सरकारने या 5 वर्षात महाराष्‍ट्राला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर केले आहे. कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेस च्‍या सरकारला महाराष्‍ट्राचा विकास करणे शक्‍य झाले नाही. स्‍वतःच्‍या विकासातच ते मग्‍न राहिले. या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात महाराष्‍ट्र आघाडीवर आहे. आम्‍ही केलेली कामे घेवून जनतेशी संवाद साधण्‍यासाठी ही महाजनादेश यात्रा घेवून आम्‍ही निघालो आहे. महाराष्‍ट्रातील जनता आम्‍हाला पुन्‍हा एकदा महाजनादेश देईल, असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला. यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच वर्षात चंद्रपूर जिल्‍हयात झालेल्‍या विकासकामांची जंत्री उपस्थितांसमोर मांडली. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्‍हयाच्‍या सिंचनाच्‍या दृष्‍टीने वरदान ठरणारा चिचडोह प्रकल्‍प आपण पूर्ण केला असून कोटगल सिंचन प्रकल्‍पाचे लवकरच भूमीपूजन होणार आहे. जिल्‍हयाचे माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण व दुरूस्‍ती, पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना, चिचाळा व 6 गावांना सिंचन सुविधा पुरविण्‍यासाठी 23 कोटी रू. किंमतीची योजना, नलेश्‍वर मध्‍यम प्रकलपाचे काम अशी मोठया प्रमाणावर सिंचनाची कामे जिल्‍हयात झाली आहे. मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा निर्णय आमच्‍या शासनाने घेतला असून टाटा ट्रस्‍ट च्‍या सहाय्याने मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपूर, जिवती, गोंडपिपरी आणि नागभीड या तालुक्‍यांमध्‍ये सधन शेतकरी प्रकल्‍प आम्‍ही राबवित आहोत. चिचपल्‍ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, जागतीक दर्जाची वनअकादमी, बॉटनिकल गार्डन, देशातील अत्‍याधुनिक सैनिक शाळा, पोंभुर्णा तालुक्‍यात रोजगारासाठी कुक्‍कुटपालन व दुग्‍धव्‍यवाय प्रकल्‍प, टूथपिक उत्‍पादन केंद्र, अगरबत्‍ती उत्‍पादन केंद्र बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट, पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा, कॅन्‍सर हॉस्‍पीटल, मेडीकल कॉलेज अशी विकासकामांची दिर्घ मालिका आम्‍ही तयार केली आहे. पायाभूत सुविधांच्‍या माध्‍यमातुन हा जिल्‍हा समृध्‍द करण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही केला आहे. हा जिल्‍हा महाराष्‍ट्रात विकास प्रक्रियेत अग्रेसर ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला. सभेचे संचालन जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले यांनी केले. सभेला मुल शहर व तालुक्‍यातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment