कोरपना तालुक्यातील नारंडा आरोग्य केंद्रात कार्यरत तसेच कोरपना येथे खाजगी दवाखाना चालवीत असलेल्या आकाश जीवणे नामक डॉक्टरवर अश्लील फोटो व्हायरल करून एका मुलीचे लग्न मोडल्याच्या तक्रारीवरून कोरपना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की सदर पिडीत मुलगी अंदाजे २०१६ पासून डॉ.आकाशच्या घरी व त्याच्या खाजगी दवाखान्यात काम करीत होती अशी माहिती असून याच दरम्यान त्यांचे संबंध जुळून आले आणि जवळीक वाढत गेली.याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याने हळू हळू त्यांच्यातील प्रेम संबंध वाढत गेले.परंतु काही दिवसांपूर्वी मुलीचा विवाह ठरला होता.
डॉ.जीवणेला कदाचित हे पटले नसावे म्हणून याने विवाह ठरलेल्या मुलाला “माझे व हिचे खूप दिवसापासून संबंध आहे.” असे सांगून पिडीतीचे अश्लील फोटो पाठवल्याची माहिती असून यामुळे नवऱ्या मुलांकडून विवाह मोडण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे.हे प्रकरण माहित होताच पिडीतीने कोरपना पोलीस स्टेशन गाठून डॉ.विरूद्ध रितसर तक्रार दाखल केली.या आधारे पोलिसांनी कलम ३७६ व आयटी एॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर विषयी वृत्तलिहीत्सव आरोपी डॉ.ला अटक झाली नव्हती.परंतु फरार डॉक्टर ला शोधण्याकरिता पोलीस पथक फिरत असून स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणावर लक्ष ठेऊन असल्याची असल्याची माहिती आहे.
परंतु या डॉक्टर चा इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा व्यवहार ठीक नसून अनेकांना या त्या कारणाने मानसिक त्रास देण्याच्या व्यक्तिगत तक्रारी आहेत.
0 comments:
Post a Comment