कोरपना येथील डॉक्टर आकाश जीवने यांनी युवतीवर केलेल्या अत्याचारा विरोधात नाभिक समाजाचा मूक मोर्चा!
चंद्रपूर. नारंंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर आकाश जिवणे यांनी कोरपना येथे स्वतःच्या खाजगी रुग्णालयात पीडित युवतीला सन 2016 पासून कामाकरिता ठेवली होती. त्याचा फायदा घेऊन डॉक्टर जीवन यांनी तिच्यावर सातत्याने अत्याचार करीत होता. त्याच वेळेस युवतीचे अश्लील छायाचित्र चोरून काढून ठेवुन तिला दाखवून ब्लॅकमेल करून शारीरिक सुखाची वारंवार मागणी करायचा, मात्र पिडीत युवती आपल्या बदनामी पोटी अत्याचार सहन करीत होती. काही दिवसांपूर्वीच युवतीचे लग्न जुडले होते. 23 डिसेंबर2019 मुलीचे साक्षगंध पार पडला. याची माहिती या नराधमाला होताच. दिनांक 24 डिसेंबर 2019 ला तिच्या भावी पती होणाऱ्या मुलाला मोबाईलवर तिचे अश्लील चित्र पाठवले व ती माझी रखेल आहे. तिच्याशी लग्न केलास तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे त्या मुलांनी जोडलेले लग्न मोडले. त्यामुळे मुलीची व त्या परिवाराची नाहक बदनामी झाली. त्या परिवारावर फार मोठे आभाळ कोसळले, नाहक बदनामी झाल्यामुळे पूर्ण परिवार दहशतीत आहे. संपूर्ण घटनेची रीतसर तक्रार कोरपना पोलीस स्टेशन येते दाखल करण्यात आली .त्यासंदर्भात भा द वि कलम 376 , 376/२ व आयटीसी अॅक्ट ६७ गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा चंद्रपूर व समस्त नाभिक समाजा तर्फे या नराधमाला त्याचा (डॉक्टरकीचा) वैद्यकीय परवाना रद्द करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या मूक मोर्चा द्वारे मस्त नाभिक समाजाकडून करण्यात आली. यावेळी कोरपना येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेता विजयजी बावणे, शिवसेना तालुकाप्रमुख अरुण मस्से, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवनकर जिल्हासचिव उमेश नक्षीने, जिल्हाध्यक्ष मानीकचद चन्ने, तालुका अध्यक्ष कवडू खोबरकर, यवतमाळ जिल्ह्याचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष डुड्डू भाऊ नक्षीने, श्याम भाऊ राजूरकर, रामदासजी क्षिरसागर, बंडू भाऊ क्षिरसागर, धाबेकरजी, बंडू भाऊ चौधरी, उमेश आंबेकर, गजानन लांडगे, तसेच महिला व नाभिक समाजातील शेकडो कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment