चंद्रपूर एसटी कर्मचाऱ्याची शिवशाहीत मद्यप्राशन करून धिंगाणा!
चंद्रपूर - महाराष्ट्र सरकारच्या नवीन हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 डिसेंबर पासून सुरु झाले होते. त्या अधिवेशनासाठी विदर्भासह सर्व महाराष्ट्रातील संघटना तसेच राजकारणी पार्टी नागपुरात दाखल झाल्या होत्या. याच अधिवेशनात चंद्रपूर एसटी महामंडळाचे कर्मचारी मीटिंगसाठी नागपुरात आले होते. दिनांक 19 डिसेंबरला चंद्रपूर एसटी डेपो चे काही कर्मचारी मीटिंग संपल्यावर चंद्रपुरात दारू बंद आहे म्हणून, नागपुरातच दारू ढोकसून नागपूर बस स्टॅन्ड वर आली, सायंकाळी पाच वाजता नागपूर वरून सुटणारी शिवशाही एम एच 29 बी ई 1067 बस मध्ये बसलेत, एवढ्यावरच थांबले नाही तर या महाशयांनी बस मध्येच आपल्या आजूबाजूला कोणी आहे का ?याचे भान न ठेवता अव्याच्य शब्दात जोर जोराने मध्ये ओरडणे सुरू केले. पॅसेंजर सोबत मुजोरी करून आमच्या बापाची गाडी आहे .'तुम्हाला या गाडीत बसायचे असेल तर बसा' नाहीतर खाली उतरून जा, असा दम देऊन, थांबले नाही तर स्वतः दारू पिऊन असताना ही बस आता पोलीस स्टेशनमध्ये जाईल अशी धमकावणी देऊ लागले. बस मधील सर्व पॅसेंजर मूकसंमती ते सर्व सहन करीत होते. मात्र या कर्मचाऱ्यांची मुजोरी काही केल्या धिंगाना थांबेना. या शिवशाही बस मध्ये वाहक महिला कर्मचारी असतानासुद्धा या प्रकाराकडे त्यांनीही दुर्लक्ष केले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बससेवा हि तुमच्या कर्मचाऱ्यासाठी असेल, तर जनतेनी काय करायचं असा प्रश्न आता बस प्रवासी विचारू लागले आहेत. कर्मचाऱ्यावर अधिकार्याचे वर्चस्व नसेल किंवा झालेला प्रकारावर कारवाई होणार कि नाही असा प्रश्न आता प्रवासी करीत आहेत.
0 comments:
Post a Comment