Ads

संसदेच्या चंद्रपूर जिल्हा समन्वयकपदी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व जि.प. सदस्य संजय होमराजजी गजपुरे यांची नियुक्ती

एमआयटी -पुणे' शिक्षणसंस्थासमुहाच्या 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' अंतर्गत 'महाराष्ट्र सरपंच संसद' स्थापन करण्यात आली आहे.या संसदेच्या चंद्रपूर जिल्हा समन्वयकपदी जिल्ह्यातील  सामाजिक कार्यकर्ते व जि.प. सदस्य संजय होमराजजी गजपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातीलबल्लारपूर भद्रावती, ब्रम्हापुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, जिवती, कोरपना, मूल, नागभीड, पोंभुरणा, राजुरा,सावली,सिंदेवाही व वरोरा या पंधरा तालुक्यात होणाऱ्या सरपंच संसदेच्या कार्याचे ते समन्वयक असतील.अशी माहिती या संसदेचे नागपूर विभाग  समन्वयक विनय दाणी यांनी दिली.

निवडपत्र व ओळखपत्र वितरण  तसेच 'महाराष्ट्र सरपंच संसदे' च्या विद्यमाने पुढील वर्षात आयोजित करावयाच्या विविध उपक्रमांविषयी विचारविनिमय करण्यासाठी बुधवार,दि.८ जानेवारी २०२० रोजी  'एमआयटी, पुणे' येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात संजय गजपुरे यांच्या बरोबरच  महाराष्ट्रातील उर्वरित सर्व जिल्हातील सरपंच संसदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्र व ओळ्खपत्रांचे वितरण होईल.

'एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी -पुणे' चे कार्याध्यक्ष व   'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' चे द्रष्ट्ये संस्थापक राहुल कराड त्यांच्या संकल्पनेतून  'महाराष्ट्र सरपंच संसद' स्थापन झाली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण ग्रामविकास प्रक्रियेत पंचायतराज व्यवस्थेतील लोकनियुक्त लोकप्रतिनिधींची भूमिका मध्यवर्ती व सर्वात महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्याच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे,त्यांचे सर्वांगीण प्रबोधन करणे व विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्वक संयोजन करून त्यांना प्रत्यक्ष ग्रामविकास प्रक्रियेत मौलिक सहकार्य करणे हे 'महाराष्ट्र सरपंच संसदे'चे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.


सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या कार्यरत व्यक्तींचे नेटवर्क तयार करून त्यांच्या सहकार्याने हे ग्रामविकासाचे राज्यस्तरावरील महत्वपूर्ण अभियान यशस्वीरीत्या विस्तारित करण्याचे काम 'महाराष्ट्र सरपंच संसद' करीत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment